20 वर्ष लहान तरुणाला पाहून 2 मुलांच्या आईची नियत फिरली, अनैतिक संबंधानंतर थेट...
उत्तर प्रदेशातील संभलमध्ये प्रेमात बुडालेल्या एका महिलेने वेगळाच कारनामा केल्याची बातमी समोर आली आहे. येथे 2 मुलांची आई असलेल्या महिलेचं आपल्याहून 20 वर्षे लहान तरुणावरच प्रेम जडलं. प्रेमाच्या नादात तिने मोठं पाऊन उचलल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

2 मुलांची आई असलेल्या महिलेचं 20 वर्ष लहान तरुणावर प्रेम

प्रेमात पडलेल्या महिलेनं उचललं मोठं पाऊल

दोन मुलांना सोबत घेऊन गेली प्रियकराच्या घरी
Crime News: प्रेमाला वयाचं बंधन नसून प्रेम व्यक्तीला काहीही करायला भाग पाडतं, असं म्हटलं जातं. खरंतर, उत्तर प्रदेशातील संभलमध्ये प्रेमात बुडालेल्या एका महिलेने वेगळाच कारनामा केल्याची बातमी समोर आली आहे. येथे 2 मुलांच्या आईचं आपल्याहून 20 वर्षे लहान तरुणावरच प्रेम जडलं. प्रेमाच्या नादात तिने मोठं पाऊन उचलल्याचं सांगितलं जात आहे. नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशातील संभल मध्ये एक विचित्र घटना घडली आहे. इथे राहणारी दोन मुलांची आई असलेली एक महिला आपल्याहून 20 वर्षे लहान असलेल्या तरुणाच्या प्रेमात पडली. एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर त्या दोघांमध्ये अनेकदा शारीरिक संबंध बनले. त्यानंतर एके दिवशी ती महिलच्या तिच्या दोन मुलींना सोबत घेऊन मुरादाबादमधील छजलैट येथील आपल्या प्रियकराच्या घरी गेली आणि आपल्याहून 20 वर्षे लहान असलेल्या प्रियकरासोबत तिने लग्न केलं. त्यादिवशी महिलेचा पती घरी आल्यानंतर त्याला आपली पत्नी कुठेच दिसली नाही. त्यावेळी पती त्याच्या आईसोबत आपल्या बायकोला शोधण्यासाठी पोहचला आणि पत्नीच्या प्रियकराच्या घरी गेला. तिथे गेल्यावर पतीला मोठा धक्का बसला कारण त्यावेळी महिलेने कोणा दुसऱ्याच तरुणाच्या नावाचं मंगळसूत्र घातलं होतं.
हे ही वाचा: मुलीने पाहिले आईचे 'ते' कारनामे! ठार मारून बेडमध्ये टाकलं आणि मृतदेह काढून परफ्यूम...
सासू आणि पतीला बसला मोठा धक्का
या घटनेनंतर महिलेची सासू आणि तिच्या पतीने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, सासू आणि नवऱ्याचं काहीच न ऐकता तिने त्यांच्या म्हणण्याला स्पष्ट नकार दिला. या प्रकरणातील आरोपी महिलेला एक 16 वर्षांची आणि एक 13 वर्षांची अशा दोन मुली आहेत. तिच्या दोन्ही मुलींना सोबत घेऊन ती छजलैट गावात गेली. तिथे गेल्यानंतर तिने आपल्या प्रियकरासोबत लग्न केलं. तरुणाने लग्न झाल्यानंतर महिलेला आपल्यासोबत आपल्या घरी नेणार असल्याचं सांगितलं होतं. यासोबतच, तिच्या मुलींचा देखील सांभाळ करणार असल्याचं त्याने महिलेला म्हटलं होतं. हे सगळं ऐकून महिलेचा पती आणि सासू थक्क झाले.
हे ही वाचा: बऱ्याचदा शरीर संबंध ठेवले अन् प्रियकराला विचारला एक प्रश्न... उत्तर ऐकून बसला मोठा धक्का, नेमकं काय केलं?
प्रियकरासोबत गेली पोलीस स्टेशनमध्ये
टी.व्ही 9 च्या रिपोर्टनुसार, या प्रकरणाबद्दल अगदी रात्रीपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये वाद सुरू होता. यानंतर महिलेच्या कुटुंबातील सदस्य संभलहून छजलैटला पोहचले. लग्न झाल्यानंतर महिलेने पुन्हा आधीच्या नवऱ्याच्या घरी येण्यास स्पष्ट नकार दिला. ती तिच्या दोन्ही मुलींना घेऊन प्रियकरासोबत पळून गेली. परिसरात या प्रकरणाबद्दल बरीच चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळत आहे.