मुलीने पाहिले आईचे 'ते' कारनामे! ठार मारून बेडमध्ये टाकलं आणि मृतदेह काढून परफ्यूम...
उत्तर प्रदेशात एका महिलेने आपल्या 6 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची मन हेलावून टाकणार घटना घडली. मुलीने आपल्या आईचे असे काही कारनामे पाहिले, ज्यामुळे महिलेनं तिची हत्या केल्याचा खुलासा करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुलीने पाहिलं आपल्याच आईला आक्षेपार्ह स्थितीत
आईने 6 वर्षांच्या मुलीची केली हत्या आणि मृतदेह बेडमध्ये टाकून...
Crime News: उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एका महिलेने आपल्या 6 वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची मन हेलावून टाकणार घटना घडली. मुलीने आपल्या आईचे असे काही कारनामे पाहिले, ज्यामुळे महिलेनं तिची हत्या केल्याचा खुलासा करण्यात आला आहे. पोलिसांना सुद्धा या प्रकरणात उघडकीस आलेल्या बाबीमुळे मोठा धक्का बसला आहे. नेमकं प्रकरण काय?
मुलीला केली मारहाण अन् नंतर हत्या
खरंतर, 6 वर्षांच्या सायनारा उर्फ सोनीने तिची आई रोशनीला तिच्या प्रियकराशी शारीरिक संबंध बनवताना पाहिले होते. महिला पती घरी नसताना प्रियकरासोबत संबंध बनवायची आणि हेच तिच्या मुलीने पाहिले. त्यावेळी सोनी आपल्या आईला म्हणाली, "मी पप्पांना हे सगळं सांगेन." त्यावेळी महिलेने आपल्या मुलीला आधी शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुलगी ऐकत नसल्यामुळे महिलेने अगदी क्रूरपणे मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली आणि यामध्ये तिला तिच्या प्रियकराची साथ होती. खून केल्यानंतर त्या दोघांनी मुलीचा मृतदेह बेडमध्ये लपवून ठेवला.
त्यानंतर रोशनी आणि तिचा प्रियकर उदित जायसवालने त्याच बेडवर पार्टी केली आणि ड्रिग्ज सुद्धा घेतले. जेव्हा मृतदेहातून दुर्गंध येऊ लागला तेव्हा तिने तो बाहेर काढला आणि एसीजवळ ठेवला. त्यानंतर त्यावर भरपूर परफ्यूम स्प्रे केला आणि फरशी डिटर्जेंटने धुतली. एवढ्यावर ती थांबली नाही. तिने आपल्या मुलीच्या हत्येचा आरोप पतीवर टाकण्याचा प्लॅन बनवला.
पोलिसांच्या तपासात झाला खुलासा
रोशनीने पोलिसांना फोन केला आणि आपला पती मुलीची हत्या करून पळून गेल्याचं तिने सांगितलं. पण तिचं हे खोटं फार काळ लपून राहिलं नाही. पोलिसांनी मृतदेह पाहिल्यानंतर तो जुना म्हणजेच मुलीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचं आढळून आलं. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. त्यानंतर मुलीची 36 तासांपूर्वी हत्या झाल्याचा पोस्टमॉर्टमध्ये खुलासा करण्यात आला. यामुळे पोलिसांच्या मनात वेगळाच संशय आला.










