Yavatmal: देव दर्शनाआधीच काळाने रस्त्यात गाठलं, सहा जणांनी नाल्यातच सोडला जीव

प्रशांत गोमाणे

17 Jan 2024 (अपडेटेड: 17 Jan 2024, 04:20 AM)

नागपूरपासून 260 किमी अंतरावर असलेल्या जवाहर नगर, पुसद येथील रहिवासी गणेश राठोड यांच्या कुटुंबातील 15 जण एका वाहनाने उमरी पोहरा देवीकडे जात होते. या प्रवासा दरम्यान बेळगावी पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटोरिक्षा थेट नाल्यात कोसळ्याची घटना घडली.

yavatmal accident news rickshaw fell into a canal 6 passenger death shocking accident news

yavatmal accident news rickshaw fell into a canal 6 passenger death shocking accident news

follow google news

Yavatmal Accident News : यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेली ऑटोरिक्षा थेट नाल्यात कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह नाल्यातू बाहेर काढले आहेत.तसेच ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या प्रकरणाचा अधिकस तपास पोलीस करत आहेत. या घटनेने यवतमाळमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. (yavatmal accident news rickshaw fell into a canal 6 passenger death shocking accident news)

हे वाचलं का?

यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक राजेश राठोड यांनी दिलेल्या माहितीनूसार, नागपूरपासून 260 किमी अंतरावर असलेल्या जवाहर नगर, पुसद येथील रहिवासी गणेश राठोड यांच्या कुटुंबातील 15 जण एका वाहनाने उमरी पोहरा देवीकडे जात होते. पोहरा देवीचा नवस फेडायला हे प्रवासी जात असल्याची माहिती आहे. या प्रवासा दरम्यान बेलगव्हाण पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ऑटोरिक्षा थेट नाल्यात कोसळ्याची घटना घडली. या अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : शाहांनी दिला स्पष्ट ‘मेसेज’! ४८ जागांसाठी १२ क्लस्टर, स्ट्रॅटजी काय?

या भीषण घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह नाल्यातून बाहेर काढले आहेत. तसेच हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सहाही मृतांची अद्याप नावे समोर आली नाही आहेत. तसेच नाल्यातून ऑटोरिक्षा बाहेर काढण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

पुण्यातही काही दिवसांपूर्वी भीषण रस्ते अपघाताची घटना घडली होती. या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता. अहमदनगरहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप वाहनाची पिंपळगाव जोगा येथील पेट्रोल पंपाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ऑटो रिक्षाला धडक बसली होती. त्यामुळे या अपघातात रिक्षा आणि पिकअप वाहनाच्या चालकासह 8 जणांचा मृत्यू झाला होता. पुणे शहरापासून सुमारे 150 किमी अंतरावर असलेल्या कल्याण-अहमदनगर रस्त्यावरील ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेने पुण्यात हळहळ व्यक्त होत होती.

    follow whatsapp