चुलत भावाच्या पत्नीशी होते संबंध..भाजप नेत्याच्या मृत्यू प्रकरणात खळबळजनक माहिती आली समोर, काय घडलं होतं?

Today Shocking Viral News :  उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. मुरादाबाद जिल्ह्यात भाजपचे बूथ अध्यक्ष रिंकू सिंह यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला.

Today Shocking Viral News

Today Shocking Viral News

मुंबई तक

• 10:20 PM • 16 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

अवैध संबंध बनले हत्येमागचं कारण

point

मृतदेह सापडल्यानंतर उडाली खळबळ

point

कॉल डिटेल्समुळे पर्दाफाश झाला अन्..

Today Shocking Viral News :  उत्तरप्रदेशच्या मुरादाबाद जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली. मुरादाबाद जिल्ह्यात भाजपचे बूथ अध्यक्ष रिंकू सिंह यांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला. ज्या हत्याप्रकरणी वेगवेगळ्या प्रकारची माहिती समोर येत होती, त्या हत्येचा हट घरातीलच सदस्याने रचला होता. आता पोलिसांच्या तपासात समोर आलं की, रिंकूची हत्या त्याच्याच चुलत भावाने अरुण सिंहने केली होती. पोलिसांनी हत्येचा गुढ उकललं असून आरोपीला अटक केली आहे.

हे वाचलं का?

अवैध संबंध बनले हत्येमागचं कारण

पोलीस तपासात समोर आलं की, रिंकू सिंह आणि अरुण सिंह यांची पत्नी यांच्यात अवैध संबंध होते. एसपी सिटी रणविजय सिंह यांच्या माहितीनुसार, दोघेही नेहमी फोनवर बोलायचे. रिंकू सिंह अरुणच्या अनुपस्थितीत तिच्या घरीही जात होता. पण अनेकदा त्यांच्या वादविवाद होत होते. अरुणने याबाबत रिंकूचे वडील आणि त्यांच्या मामाकडे तक्रार दाखल केली होती. पण त्याबाबत कोणतंही मार्ग निघाला नाही.

1 ऑगस्टच्या रात्री अरुणने त्याचे चुलत भाऊ रिंकूला रतनपूर कला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावलं. त्याने आधीपासूनच दारूच्या बाटल्यांमध्ये विषारी केमिकल मिक्स केलं होतं. जे त्याने एका फॅक्ट्रीतून घेतलं होतं. रिंकूने ते द्रव्य पिल्यावर अचानक त्याची तब्येत बिघडली आणि काही काळानंतर त्याचा मृत्यू झाला. 

हे ही वाचा >> Jai Jawan Dahi Handi 2025: जय जवान गोविंदा पथकही ठरलं सरस, झरझर चढले आणि 10 थर रचले, एकाच दिवस दोन मंडळांकडून विश्वविक्रम!

मृतदेह सापडल्यानंतर उडाली खळबळ

2 ऑगस्टच्या सकाळी रतनपूर येथे लोकांनी जेव्हा रिंकू सिंहचा मृतदेह पाहिला. तेव्हा परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोहचले आणि तपास सुरु केला. रिंकू सिंह भाजपचे स्थानिक अध्यक्ष होते, त्यामुळे याप्रकरणाला वेगळंच वळण लागलं.

कॉल डिटेल्समुळे पर्दाफाश झाला अन्..

पोलिसांच्या टीमने याप्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत तपासाची सूत्रे फिरवली. रिंकू सिंहच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (CDR) पाहिल्यावर अरुणचं नाव समोर आलं. संशयामुळे पोलिसांनी अरुणची चौकशी केली, त्यानंतर अरुणने गुन्हा कबूल केला.

हे ही वाचा >> 'त्यांचं' लव्ह मॅरेज झालं..13 दिवसानंतर नवरी झाली गायब! जावयाने सासऱ्यावर घेतला संशय अन् घडलं असं काही...

अटक केल्यानंतर गुन्हा कबूल केला

चौकशीदरम्यान, अरुणने पोलिसांना सांगितलं की, तो अनेकदा रिंकूला समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याने त्याच्या पत्नीसोबत असलेला संपर्क कमी केला नाही. मजबुरीत त्याने हे भंयकर पाऊल उचललं. आता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. रिंकू सिंहच्या मृत्यूमुळं कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्याच्या पश्चात पत्नी आणि पाच मुली आहेत.

    follow whatsapp