Jai Jawan Dahi Handi 2025: जय जवान गोविंदा पथकही ठरलं सरस, झरझर चढले आणि 10 थर रचले, एकाच दिवस दोन मंडळांकडून विश्वविक्रम!

मुंबई तक

Jai Jawan Dahi Handi 10 Thar: कोकणनगर गोविंदा पथकाने ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत 10 थर रचून विश्वविक्रम केला तर त्या पाठोपाठ जय जवान मंडळाने देखील घाटकोपरमध्ये 10 थर लावून लागलीच विश्वविक्रमाशी बरोबरी केली.

ADVERTISEMENT

jai jawan dahi handi 2025 jai jawan govinda mandal also proved to be excellent climbed up steeply and created 10 thar world record from two teams in the same day
फोटो सौजन्य: Instagram
social share
google news

मुंबई: ठाण्यात कोकण नगर मंडळाने ठाण्याच्या संस्कृती दहीहंडीमध्ये 10 थर लावल्यानंतर घाटकोपरमधील मनसेच्या दहीहंडी उत्सवात जय जवान गोविंदा पथकाने देखील 10 थर रचले. त्यामुळे एकाच दिवसात दोन-दोन मंडळांनी विश्वविक्रम केला आहे.

जय जवान पथकाची पार्श्वभूमी:

जय जवान गोविंदा पथक हे मुंबईतील जोगेश्वरी येथील एक प्रसिद्ध पथक आहे, ज्याला "उपनगरचा राजा" म्हणून ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून हे पथक 9 थर रचून दहीहंडी उत्सवात आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहे. यंदा त्यांनी 10 थर रचण्याचा सुरुवातीला प्रयत्न केला होता, परंतु तो यशस्वी झाला नव्हता. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा 10 थर लावण्याचा प्रयत्न केला. जो यशस्वी झाला आणि कोकण नगर पाठोपाठ जय जवान गोविंदा मंडळाने देखील विश्वविक्रम रचला. 2024 साली जय जवान पथकाचा 10 थरांचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. पण यंदा मात्र त्यांना यामध्ये मोठं यश आलं आहे.

फोटो सौजन्य: Instagram

जय जवान आणि मनसेची दहीहंडी:

जय जवान पथकाने यापूर्वी मनसेच्या दहीहंडी उत्सवात 9 थर रचून यश मिळवले आहे. 2022 आणि 2023 मध्ये ठाणे आणि भांडुप येथील मनसेच्या दहीहंडीत त्यांनी 9 थर रचले होते. मात्र, यंदा घाटकोपरच्या मनसेच्या दहीहंडीत जय जवान पथकाने 10 थर रचून स्वत:चाच विक्रम मोडीत काढला आहे.

दहीहंडी उत्सव २०२५: कोकणनगर पथकाचा ऐतिहासिक विश्वविक्रम

दरम्यान, ठाण्यातील वर्तकनगर येथे संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित "संस्कृतीची दहीहंडी, विश्वविक्रमी दहीहंडी" या कार्यक्रमात जोगेश्वरीतील कोकणनगर गोविंदा पथकाने 10 थरांचा मानवी मनोरा रचून सर्वात प्रथम विश्वविक्रम नोंदवला. या यशस्वी प्रयत्नाने त्यांनी जोगेश्वरीच्याच जय जवान गोविंदा पथकाचा 9 थरांचा यापूर्वीचा विक्रम मोडला.

हे वाचलं का?

    follow whatsapp