'त्यांचं' लव्ह मॅरेज झालं..13 दिवसानंतर नवरी झाली गायब! जावयाने सासऱ्यावर घेतला संशय अन् घडलं असं काही...
Love Marriage Viral News : दोघेही ऐकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. दोघांनीही 15 मे रोजी एका समाज मंदिरात लग्न केलं. पण लग्नाच्या 13 दिवसानंतर नवरीला तिच्या वडील घरी घेऊन गेले.

बातम्या हायलाइट

बेपत्ता झालेल्या पत्नीचा शोध सुरु केला

हायकोर्टाने मुंगेली एसपींना दिले आदेश

त्या गावात नेमकं काय घडलं?
Love Marriage Viral News : दोघेही ऐकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. दोघांनीही 15 मे रोजी एका समाज मंदिरात लग्न केलं. पण लग्नाच्या 13 दिवसानंतर नवरीला तिच्या वडील घरी घेऊन गेले. मुलीला काही दिवसांसाठी माहेरी घेऊन चाललो आहे, असं सासऱ्याने जावयाला सांगितलं. पण त्यानंतर नवरी बेपत्ता झाली. पतीने त्याच्या पत्नीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. पोलिसांनीही पतीला कोणतीही मदत केली नाही, असा आरोप आहे. त्यानंतर पतीने हायकोर्टात धाव घेतली.
हायकोर्टाने पोलीस अधिक्षकांना निर्देश दिले आहेत की, 28 ऑगस्टपर्यंत मुलीला शोधून न्यायालयात हजर करावं. ही घटना छत्तीसगढच्या बिलासपूरमध्ये घडली. बिलासपूरमध्ये राहणारा सूरज बंजारे आणि मुंगेली येथील तरुणीचे मैत्रीचे संबंध होते. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु झाले. 15 मे 2025 रोजी सूरजने तरुणीसोबत लव्ह मॅरेज केलं. त्यानंतर दोघेही पती-पत्नी म्हणून राहत होते. तरुणाने आरोप केला आहे की, 28 मे रोजी तरुणीचे कुटुंबीय तिला भेटायला गेले होते. त्यानंतर ते तिला जबरस्ती घेऊन गेले.
बेपत्ता झालेल्या पत्नीचा शोध सुरु केला
सूरजने म्हटलं की, त्याची पत्नी घरी परतणार होती. पण ती जेव्हा घरी आली नाही. तेव्हा तिचा शोध सुरु केला. तरुणीच्या कुटुंबियांनाही काही माहिती दिली नाही. त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. पण पोलिसांनाही सहकार्य केलं नाही. त्यानंतर हायकोर्टात धाव घेऊन याचिका दाखल करावी लागली. या याचिकेत म्हटलंय की, तरुणीचे कुटुंबीय तिच्याबाबत माहिती देत नाही आणि तिच्यासोबत भेटही करवून देत नाहीत.
हे ही वाचा >> Dahi Handi 2025: ठाण्यात विश्वविक्रम, 10 थरांची कडक सलामी... 'कोकण नगर' गोविंदा पथकाने रचला इतिहास
पत्नीसोबत काही भयंकर घडू शकतं, अशी भीती पती सूरजला आहे. या लोकांनी माझ्या पत्नीला मारलं असेल, असा मला संशय आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलाने कोर्टात म्हटलं की, तरुणीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तिला तातडीनं न्यायालयात हजर करावं. जेणेकरून ती सुरक्षीत आहे की नाही, हे माहित होईल.
हायकोर्टाने मुंगेली एसपींना दिले आदेश
या प्रकरणाच्या सुनावणीनंतर हायकोर्टाने प्रकरण गांभीर्याने घेतलं. कोर्टाने मुंगेली एसपींना तरुणीचा शोध घेण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. तसच 28 ऑगस्टपर्यंत मुलीला कोर्टात हजर करण्याचे आदेशही दिले. तसच तरुणीच्या वडिलांनाही हजर राहण्यास सांगितलं आहे.