Married Woman Shocking News : राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. येथे ज्योतिषाविरोधात एका महिलेनं गंभीर आरोप केले आहेत. महिलेनं आरोप केले की, ज्योतिषी सुभाशीष मुखर्जी उर्फ दादा ज्योतिषाने भविष्याबाबत भीती दाखवून तिला घटस्फोट घ्यायला मजबूर केलं. तसच तिला गुंगीचं औषध देऊन तिचं शारीरिक शोषण केलं. इतकच नव्हे, आरोपीने महिलेसोबत एका समाज मंदिरात लग्न केलं. त्यानंतर ब्लॅकमेलिंग, हुंड्याची मागणी करत तो फरार झाला. पीडितेनं चिनहट पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
सुरेंद्रनगर चिनहट येथे राहणाऱ्या महिलेनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय, नोव्हेंबर 2022 मध्ये तिची ओळख मानस विहार येथील सुभाशीष मुखर्जीसोबत झाली. आरोपीने भविष्यवाणी करत भीती दाखवून पतीसोबत घटस्फोट घ्यायला लावला. त्यानंतर जे मागणं आलं, त्यांना चुकीचे ठरवून नकार देण्यास भाग पाडलं. महिलेनं आरोप केला की, याचदरम्यान आरोपीने प्रसादात गुंगीचे औषध टाकून तिचं लैंगिक शोषण केलं.
हे ही वाचा >> Dahi Handi 2025: ठाण्यात विश्वविक्रम, 10 थरांची कडक सलामी... 'कोकण नगर' गोविंदा पथकाने रचला इतिहास
पीडितेनं आरोपीवर केले गंभीर आरोप
पीडितेनं म्हटलं की, 28 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपीनं फूस लावून तिला त्याच्यासोबत नेलं आणि गुंगीचे औषध दिल्यानंतर लग्न लावलं. या विवाह सोहळ्यात तिचे कुटुंबीय उपस्थित नव्हते. लग्नानंतर आरोपीने तिला मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या त्रास दिला. महिलेनं पोलिसांना सांगितलं की, लग्नाच्या काही दिवसानंतर आरोपीने पैसे आणि सोन्याची मागणी केली. विरोध केल्यावर त्याने शिविगाळ आणि मारहाण केली.
अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली
इतकच नव्हे, तर अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केलं. लग्नानंतर मला कळलं की, आरोपी आधीपासूनच विवाहित होता. त्याच्या पत्नीचा कोरानामुळे मृत्यू झाला होता. तो मोलकरणीसोबतही संबंध करण्याचा प्रयत्न करायचा. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. आरोपी बरेलीहून लखनऊला फरार झाल्याची माहितीही समोर आली.
हे ही वाचा >> Mumbai Rain: आज दहीहंडीच्या दिवशीच पाऊस घालणार मुंबईत धुमाकूळ! ‘या’ भागात साचणार पाणी
ADVERTISEMENT
