अखेर नीट पेपरफुटी प्रकरणातील 'गॉड' सापडला, पुण्यात सीबीआयने केली अटक

नीट पेपरफुटी प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मनिषा हवालदार ज्या गॉड नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती त्याचा शोध घेण्यास सीबीआयला यश आलं आहे.

मुंबई तक

• 10:40 AM • 28 May 2026

follow google news

NEET Papaer Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. पुण्यातून अटकसत्र सुरुच आहे. पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातील प्राध्यापिका मनिषा हवालदार यांना अटक केली होती. मनिषा यांनी फिजिक्सचा पेपर फोडल्याचा आरोप सीबीआयकडून करण्यात आला होता. मनिषा या पुण्यातील एका कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. मनिषा हवालदार एका गॉड नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होत्या. तो गॉड कोण या प्रश्नाचा सीबीआय तपास करत होते. अखेरीस हा गॉड कोण याची माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

मनिषा हवालदार ज्या गॉड नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होती त्याचा शोध घेण्यास सीबीआयला यश आलं आहे. सीबीआयने पुण्यातून तेजस शाह या व्यक्तीला अटक केली आहे. तेजस शाह हा पुण्यातील एका क्लासमध्ये फिजिक्सचा प्राध्यपक होता. या तेजस शाहने हवालदार हिच्याकडून फिजिक्सचा पेपर खरेदी केला होता. त्यामुळे सीबीआय आता या प्रकरणात अनेकांना ताब्यात घेत आहे.