Sexual Harrassment: यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगावात 8 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये 9 वर्षांचा मुलगा आणि त्याच वर्गात शिकणाऱ्या 9 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. पीडित आणि दोन आरोपी जिल्हा परिषदेतील शाळेत एकाच वर्गात शिकत होते.
ADVERTISEMENT
शौचालयात लैंगिक अत्याचार
1 ऑगस्ट रोजी शाळेत सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गात बसले असताना 9 वर्षांच्या आरोपी मुलाने एक प्लॅन बनवला. या योजनेत त्याने त्याच्या वर्गात शिकणाऱ्या मैत्रिणीची मदत मागितली. संबंधित मुलगी सुद्धा मदत करण्यासाठी तयार झाली. त्या दोघांनी मिळून 8 वर्षांच्या निष्पाप पीडितेला काहीतरी कारण सांगून शाळेच्या शौचालयात घेऊन गेले. तिथे आरोपी मुलाने अल्पवयीन पीडितेवर लैंगिक अत्याचार केला. तसेच, वर्गातील दुसऱ्या मुलीने या सगळ्या प्रकारात आरोपी मुलाला मदत केली. दरम्यान, पीडिता अतिशय घाबरली. तिला खूप वेदना होत असताना देखील ती गप्प राहिली. इतक्या लहान वयात तिच्यासोबत काय चाललं आहे? हेच पीडितेला समजलं नसावं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी गूड न्यूज! आरे मेट्रो स्टेशन ते फिल्म सिटी पर्यंत 'रोपवे' ची योजना... MMRCL चा दावा
गुप्तांगात खूप वेदना...
घटनेच्या काही दिवसांनंतर पीडितेला गुप्तांगात खूप वेदना जाणवू लागल्या. त्यावेळी पीडिता रडू लागली आणि तिच्यासोबत घडलेला प्रकार तिने आपल्या आईला सांगितला. पीडितेच्या आईला सुद्धा खूप भिती वाटली आणि ती तिच्या मुलीला घेऊन तातडीने रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी तपास केला असता मुलीच्या गुप्तांगावर काही जखमा आढळल्या. डॉक्टरांनी याबद्दल मुलीला प्रश्न विचारल्यानंतर पीडितेने घाबरत घाबरत सगळं काही डॉक्टरांना सांगितलं. तिच्या वर्गातील एक मुलगा आणि मुलीने मिळून शौचालयात तिच्यासोबत वाईट कृत्य केल्याचं पीडितेने डॉक्टरांना सांगितलं. त्यानंतर मुलीच्या आईने थेट पोलीस स्टेशनकडे धाव घेतली आणि 9 ऑगस्ट रोजी तक्रार दाखल केली.
हे ही वाचा: 8 महिन्यांच्या पुतणीवरच भाळला! घरात कोणीच नसताना केलं घृणास्पद कृत्य अन्... कुटुंबियांनी रंगेहाथ पकडलं...
पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पोलिसांनी या प्रकरणी लगेच कारवाई केली. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. यवतमाळच्या पोलीस अधिक्षकांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घातलं. पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO कायदा) अंतर्गत अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी म्हणजेच 9 वर्षांचा मुलगा आणि एक 9 वर्षांच्या मुलीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. मात्र, आरोपी अल्पवयीन असल्याकारणाने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले.
ADVERTISEMENT
