नवरा बायकोला घेऊन हॉटेलात आला, मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यास बायकोनं केला विरोध, नंतर प्रायव्हेट पार्टवरच दिल्या लाथा

crime news : एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. पती बायकोला एका हॉटेलमध्ये घेऊन आला. तेव्हा त्या हॉटेलमध्ये पतीचा मित्र आधीच येऊन बसला होता. तेव्हा पतीने आपल्या पत्नीला मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले.

crime news (grok)

crime news

मुंबई तक

12 Aug 2025 (अपडेटेड: 12 Aug 2025, 03:12 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यास पाडले भाग

point

महिलेनं पतीला केला विरोध अन्

point

नंतर प्रायव्हेट पार्टवर मारली लाथ

crime news : कलियुगात अनेक विचित्र घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. पती बायकोला एका हॉटेलमध्ये घेऊन आला. तेव्हा त्या हॉटेलमध्ये पतीचा मित्र आधीच येऊन बसला होता. तेव्हा पतीने आपल्या पत्नीला मित्रासोबत झोपण्यास सांगितलं, ही घटना उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : ट्रकने दिली मोटारसायकलला धडक, नवऱ्याने वाहनांना थांबण्याची हात जोडून केली विनंती, अखेर नवऱ्याने बायकोचा मृतदेह गाडीला बांधला...

पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ

पत्नीने आरोप केला की, जेव्हा या गोष्टीला विरोध दर्शवला असता, पतीने आणि त्याच्या मित्राने दोघांनी मिळून मला बेदम मारहाण केली. तिच्यासोबत छेडछाडही करण्यात आली. आरोप आहे की, तिच्या पतीने पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर लाथ मारली.

हे संपूर्ण प्रकरण लखनऊ येथील चिनहट येथील आहे. दरम्यान, महिलेनं आपल्या पतीविरोधात धक्कादायक आरोप केले आहेत. महिलेनं आरोप केला की, 5 ऑगस्ट रोजी रात्री अगदी 11 वाजता फोन आला असता, पीडितेची तब्येत बिघडली होती. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये बोलावले. जेव्हा पत्नीला हॉटेलात जाण्यास नकार दिल्यानंतर, पतीने सांगितलं की, जर ती आली नाही,तर माझं मेलेलं तोंड तुला पाहावं लागेल.

पतीला पाहण्यासाठी हॉटेलमध्ये गेले अन्...

पत्नीने केलेल्या आरोपानुसार, ती पतीला पाहण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती. जशी ती हॉटेलमधील रुममध्ये पोहोचली असता, त्या ठिकाणी तिचा मित्र अनिल कुमार तिथेच होते. तेव्हा पतीने आपल्या मित्रासोबत रात्र घालवण्यास सांगितली. पत्नीने अशा कृत्याला विरोध केल्यानंतर, तिनं काहीही एक ऐकलं नाही.

हे ही वाचा : बीड हादरलं! तृतीयपंथीयाने पीडितेला कामाचे आमिष दाखवले अन् नेलं खोलीत, नंतर साथीदारांच्या मदतीने आळीपाळीने...

दरम्यान, पीडितेनं सांगितलं की, नवऱ्याचा मित्रा अनिलने छेडछाड केल्याचं बोललं जातंय. संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत. पीडितेचं म्हणणं आहे की, तिथून कसाबसा पळ काढला आणि महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संबंधित प्रकरणाबाबत सांगितले की, हॉटेलच्या कॅमेऱ्यात दोघेजण मिळून पीडितेला मारहण करत होती.

    follow whatsapp