8 महिन्यांच्या पुतणीवरच भाळला! घरात कोणीच नसताना केलं घृणास्पद कृत्य अन्... कुटुंबियांनी रंगेहाथ पकडलं...
हरियाणाच्या करनाल जिल्ह्यातील एका लहानशा गावात एका व्यक्तीने त्याच्या 8 महिन्यांच्या पुतणीवरच बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे.

बातम्या हायलाइट

8 महिन्यांच्या पुतणीवरच केला बलात्कार

आरोपी काकाने मर्यादा ओलांडल्या आणि 8 महिन्यांच्या पुतणीसोबत...
Rape Case: हरियाणाच्या करनाल जिल्ह्यातील एका लहानशा गावात मन हेलावून टाकणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका व्यक्तीने त्याच्या 8 महिन्यांच्या पुतणीवरच बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकरणातील आरोपी पीडित तरुणीचा काका असून तो पीडितेला आणि तिच्या अल्पवयीन बहिणीला आमिष दाखवून स्वत:कडे बोलावायचा आणि खेळण्याच्या बहाण्याने चिमुकलींसोबत घृणास्पद कृत्ये करायचा.
8 महिन्यांच्या पुतणीवर भाळला
करनाल जिल्ह्यातील लहानशा गावात राहणाऱ्या एका कुटुंबात वडील, त्याची पत्नी आणि दोन लहान मुली होत्या. मोठी मुलगी साडेतीन वर्षांची तर धाकटी फक्त आठ महिन्यांची होती. वडील मजूर म्हणून काम करायचे. पण वडिलांचा मोठा भाऊ, म्हणजेच मुलींचा काकाला दारूचं व्यसन होतं. तो नेहमीच दारूच्या नशेत असायचा.
बऱ्याचदा केला लैंगिक अत्याचार
एके दिवशी कुटुंबातील सदस्य मुलींना घरीच ठेवून बाहेर गेले असाताना ही धक्कादायक घटना घडली. मुलींच्यआ आरोपी काकाने आठ महिन्यांच्या एका निष्पाप मुलीवर बलात्कार केला. इतकेच नव्हे तर पीडित चिमुकली फक्त साडेतीन महिन्यांची असतानासुद्धा तिच्या काकाने तिच्यासोबत असंच घाणेरडं कृत्य केलं होतं. त्याने पीडितेच्या मोठ्या बहिणीसोबत सुद्धा असं घृणास्पद वर्तन केल्याची माहिती आहे. मात्र, त्यावेळी समाजाच्या भितीने कुटुंबातील सदस्य गप्प राहिले आणि याबद्दल कोणालाच सांगितलं नाही. परंतु, या वेळी आठ महिन्यांच्या मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिच्या काकाला रंगेहाथ पकडलं.
हे ही वाचा: Govt Job: सैन्यात नोकरीसाठी प्रयत्न करताय? प्रतिक्षा संपली... 'या' दलात 3000 हून अधिक पदांसाठी भरती!
कुटुंबियांनी केली तक्रार दाखल
या घटनेबद्दल कळताच कुटुंबियांनी तातडीने पोलिसांना फोन केला आणि त्यावेळी पोलीस घटनास्थळी पोहचले. पीडित मुलीला रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिचं मेडिकल चेकअप करण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी पीडितेवर बलात्कार झाल्याचं सांगितलं. कुटुंबियांनी मेजिस्ट्रेटमध्ये प्रकरणासंदर्भातील त्यांचा जबाब नोंदवला. पीडित चिमुकलीच्या वडिलांनी आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा: "मीच माझ्या बायकोला..." पतीने केला 'तो' एक कॉल अन् पोलीस सुद्धा हादरले, नेमकं काय घडलं?
गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करत आरोपी काकाला ताब्यात घेतलं. सदर पोलीस ठाण्याच्या एसएचओ यांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं. तसेच, आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येईल, असा त्यांनी दावा केला आहे.