Minor Girl Rape Crime News : बिहारमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेदरम्यान, पीडित मुलीची आई तिच्या भावाला राखी बांधण्यासाठी गेली होती. मुलगी घरी एकटी असल्याचा फायदा उचलत नराधमाने तिच्यासोबत अत्याचार केला. ही संतापजनक घटना समस्तीपूर जिल्ह्यात घडली. येथील पूसा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका गावात हे प्रकरण उघडकीस आलं. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला असून आरोपीला अटक केलीय.
ADVERTISEMENT
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी पीडित मुलीची आई तिच्या भावाला राखी बांधण्यासाठी गेली होती. याचदरम्यान, मुलगी घरी एकटी होती. ती झोपली असतानाच एका तरूणाने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी महिला पोलीस स्टेशनच्या अधिकारी श्रेया कुमारी यांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी नीरज कुमारला अटक केली आहे. मुलीची मेडिकल टेस्ट करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
हे ही वाचा >> श्रावणी सोमवारी काळाची झडप! कुंडेश्वरला दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची जीप दरीत कोसळली, 7 महिलांचा मृत्यू अन्..
त्या ठिकाणीही घडली होती बलात्काराची घटना
मध्यप्रदेशच्या खरगाने जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली होती. येथील एका नराधम बापाने त्याच्या 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर पीडित मुलगी प्रेग्नंन झाल्यावर तिने बाळाला जन्म दिला. त्यानंतर आरोपीने नवजात बालकाला झाडीत फेकलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्यावर अटकेची कारवाई केली.
पोलीस अधीक्षक धर्मराज मीणा यांनी म्हटलं होतं की, तपासात समोर आलं की, त्या नवजात बालकाची आई 16 वर्षांची मुलगी होती. तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पीडित मुलीनं पोलिसांना सांगितलं की, तिच्या वडिलांनी गुजरातच्या राजकोटमध्ये मजुरीचं काम करत असताना तिच्यावर अत्याचार केला.
हे ही वाचा >> अफेअरमुळे भाजप नेत्यानं रक्षाबंधनाच्या दिवशी पत्नीचा रस्त्यातच केला खून! पोलिसांनी खाकीचा दणका दाखवला अन्..
ADVERTISEMENT
