भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा मृत्यू, पण घरात 30 लाखांची रोकड, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

26 Aug 2026 (अपडेटेड: 26 Aug 2026, 02:48 PM)

Crime News : कर्नाटकातील मंड्या येथे भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या घरात 30 लाखांहून अधिक रुपयांची रोकड आढळली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचा मृत्यू

point

पण घरात 30 लाखांची रोकड, नेमकं प्रकरण काय?

Crime News : कर्नाटकातील मंड्या येथील गुथालू परिसरात एका वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या घरात मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने स्थानिकांना धक्का बसला आहे. हूर उन्निसा असे या महिलेचे नाव आहे. त्या गुथालू परिसरातील एका भाड्याच्या घरात एकट्याच राहत होत्या. हूर उन्निसा आणि त्यांची बहीण दोघीही अविवाहित होत्या. सुमारे दोन वर्षांपूर्वी बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर हूर उन्निसा एकट्याच राहत होत्या. भीक मागून त्या आपला उदरनिर्वाह करत होत्या.

हे वाचलं का?

हेही वाचा : उकळत्या कढईत पडून 25 वर्षीय मजुराचा मृत्यू, युपीच्या कामगाराचा महाराष्ट्रात दुर्दैवी अंत

मृत्यूनंतर घराची पाहणी करण्यासाठी स्थानिक पोहोचले

हूर उन्निसा यांचा रविवारी वयाशी संबंधित आजारांमुळे मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर घराची पाहणी करण्यासाठी स्थानिक नागरिक गेले असता त्यांना घरात पैशांनी भरलेल्या अनेक बॅग आढळून आल्या. स्थानिक समुदायाच्या नेत्यांनी केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार, घरात 30 पेक्षा अधिक बॅगमध्ये पैसे ठेवलेले होते. रविवारी सुमारे 8 ते 9 लाख रुपयांची रोकड मोजण्यात आली. मात्र, आणखी सुमारे 20 बॅगमधील रोकड मोजणे बाकी होते.

हेही वाचा : चौकशीतून पेपर फुटल्याचे समोर, MPSC औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; फेरपरीक्षा होणार

भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या हूर उन्निसा यांच्या घरात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने स्थानिकांना विशेष आश्चर्य वाटले. घरात सापडलेल्या एकूण पैशांची अधिकृत रक्कम प्राथमिक अंदाजाच्या वेळी निश्चित झालेली नव्हती. त्यानंतर सापडलेली रोकड सुरक्षित ठेवण्यासाठी गुथालू येथील मशिदीकडे सोपवण्यात आली. मुस्लिम समुदायातील नेत्यांनी हूर उन्निसा यांच्या नातेवाईकांना या प्रकाराची माहिती दिली असून, ते आल्यानंतर उर्वरित बॅग उघडून त्यातील रोकड मोजण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

पैशांवर कोणाचा हक्क? 

हूर उन्निसा यांच्या नातेवाईकांच्या आगमनानंतर आणि घरात सापडलेल्या संपूर्ण रकमेची निश्चिती झाल्यानंतर या पैशांवर कोणाचा हक्क असेल, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत ही रोकड मशिदीच्या ताब्यात सुरक्षित ठेवण्यात आली आहे. दरम्यान, एकट्या राहणाऱ्या आणि भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या या वृद्ध महिलेने एवढी मोठी रक्कम कशी जमा केली आणि ती इतकी वर्षे रोख स्वरूपात कशी जपून ठेवली, याबाबत स्थानिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.