गर्लफ्रेंडला पास करण्यासाठी बॉयफ्रेंडनं फोडला पेपर, नंतर दोघांचा ब्रेकअप

मुंबई तक

• 06:50 PM • 26 Aug 2026

Crime News : देशभरात पेपरफुटीचे प्रकरण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. अशातच ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी एक धक्कादायक कथित प्रेमप्रकरण समोर आलेलं आहे. एका तरुणाने प्रेयसीला परीक्षेत उत्तीर्ण होण्यास मदत करण्यासाठी प्रश्नपत्रिका मिळवून दिली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

देशभरात पेपरफुटीचे प्रकरण चांगलंच तापलं

point

ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षा पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक 

Crime News : देशभरात पेपरफुटीचे प्रकरण चांगलंच तापल्याचं दिसून येतंय. अशातच ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी एक धक्कादायक कथित प्रेमप्रकरण समोर आलेलं आहे. एका तरुणाने प्रेयसीला परीक्षेत उत्तीर्ण होण्यास मदत करण्यासाठी प्रश्नपत्रिका मिळवून दिली. प्रेयसी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्या दोघांच्या नातेसंबंधात बिघाड झाला. तरुणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती दिल्याची माहिती आहे. मुंबई गुन्हे शाखेनं या प्रकरणात सहा जणांना अटक केली आहे. या घटनेनं महाराष्ट्र हादरून गेलाय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : क्रूर बापाने कौटुंबिक वादातून सहा महिन्यांच्या बाळाला फरशीवर आदळलं

ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षा पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक 

राज्यात ड्रग्ज इन्स्पेक्टर परीक्षा 22 मार्च रोजी झाली आणि तिचा निकाल हा जुलै रोजी जाहीर करण्यात आला होता. नंतर पेपरफुटीचे प्रकरण समोर येताच परीक्षा रद्द झाल्याची माहिती समोर आली होती. मुंबई क्राइम ब्रांचचे डीएसपी राज टिळक रोशननुसार, तपासादरम्यान पेपरफुटी प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

गौरव आणि ऋतुजाचा ब्रेकअप झाल्याची माहिती

क्राइम ब्रांचनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गौरव राजेंद्र पाटील यांचा देखील समावेश आहे. आरोप असाय की, गौरवचे ऋतुजा पाटील नावाच्या तरुणीशी प्रेमसंबंध सुरू होता. ऋतुजाला परीक्षेत पास करण्यासाठी कथितरित्या पेपरची व्यवस्था केली होती, तसेच ऋतुजासह काही लोकांना देखील पेपर पुरवण्यात आले होते. अशातच ऋतुजा पेपरमध्ये पास झाली. मात्र, नुकताच गौरव आणि ऋतुजाचा ब्रेकअप झाल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा : योजनेच्या पैशांवरून नवरा-बायकोत वाद, पतीनं पत्नीची जीभ तोडली

आरोपींची ओळख समोर 

अटक करण्यात आलेल्या आरोपींची विश्वेश्वर दत्तात्रेय नकाते, गोपाल भटु मराठे, अभिजीत गणपतराव लेंडवे, प्रवीण दिलीप पाटील, गौरव राजेंद्र पाटील आणि अमृत नामदेव पाटील अशी ओळख समोर आली. पोलिसांच्या माहितीनुसार, अमृत पाटील हे ऋतुजाचे वडील आहेत. अटकेत असलेले आरोपी हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी जोडले गेलेले असल्याची माहिती आहे.