NEET विद्यार्थिनीने संपवलं जीवन, लहान बहिणीने दरवाजा उघडताच बसला धक्का

मुंबई तक

• 02:51 PM • 26 Aug 2026

Neet Student Suicide : नीटची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेत जीवन संपवलं. पीडित तरुणी ही तणावात गेली होती. ती कोटा येथे आपल्या धाकट्या बहिणीसोबत नीटचा अभ्यास करत होती, या घटनेनं परिसर हादरून गेला.

Neet Student Suicide (AI Photo)

Neet Student Suicide

Google CTA

बातम्या हायलाइट

point

विद्यार्थिनीने गळफास घेत जीवन संपवलं

point

कुटुंबियांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली

Neet Student Suicide : नीटची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थिनीने गळफास घेत जीवन संपवलं. पीडित तरुणी ही तणावात गेली होती. मृत तरुणीची खुशबू पटेल (वय 20) अशी ओळख समोर आली. मृत विद्यार्थिनी ही मूळची मध्य प्रदेशच्या छतरपुर जिल्ह्यातील रहिवासी असून ती कोटा येथे आपल्या धाकट्या बहिणीसोबत नीटचा अभ्यास करत होती. ही घटना राजस्थानच्या कोटा येथील आहे. दरम्यान, या घटनेनं परिसर पूरता हादरून गेला होता.

हे वाचलं का?

हे ही वाचा : क्षाबंधनापूर्वी दोन बहिणींची हत्या, काहीच मिनिटांत खेळ खल्लास

नेमकं काय घडलं? 

कुन्हाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी देवेश भारद्वाज यांच्या माहितीनुसार, खुशबू पटेल आणि तिची छोटी बहीण खुशी ही 2023 पासून कोटा येथे राहत होती. तिथे ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास देखील करत होती. खुशबू जेव्हा नीटच्या तयारीसाठी अभ्यास करत होती, तेव्हा तिची धाकटी बहीण तिथेच इंजीनियरिंगच्या JEE ची तयारी करत होती. 

गळफास घेत संपवलं जीवन

मंगळवारी सायंकाळी लहान बहीण खुशबू ही आपल्या कोंचिंग क्लासवरून फ्लॅटवर पोहोचली असता, दरवाजा बंद आढळून आला होता. नंतर तिने दरवाजा वाजवण्यास सुरूवात केली होती. भयभीत झालेल्या खुशीने तात्काळपणे आपल्या मैत्रिणीला फोन लावून बोलावले होते, तसेच इतर लोकांना देखील या घटनेची माहिती दिली. नंतर किल्लीच्या मदतीने फ्लॅटचा दरवाजा उघडण्यात आला. दरम्यान, आतील दृश्य पाहून तिच्या पायाखालील जमीन सरकून गेली. खुशबूचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. 

या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर मृतदेह रुग्णालयात दाखल करण्यात आला होता, मात्र डॉक्टरांच्या प्राथमिक तपासातून तिला मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयात ठेवला होता. या घटनेची माहिती खुशबूच्या कुटुंबियांना समजली होती. 

हे ही वाचा : Astrology : 28 ऑगष्ट रोजी शेवटचं चंद्रग्रहण, 'या' राशींना सतर्कतेचा इशारा

पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर तो मृतदेह कुटुंबियांकडे पोहोचवला जाईल अशी माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे. घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळली नसल्याची माहिती आहे.