क्रूर बापाने कौटुंबिक वादातून सहा महिन्यांच्या बाळाला फरशीवर आदळलं

मुंबई तक

• 05:36 PM • 26 Aug 2026

Crime News : बापाने क्रूरतेच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. कौटुंबिक वादातून आरोपीने सहा महिन्याच्या बाळाला उचलून फरशीवर आदळलं. हैवान बापाच्या या क्रूरतेनं चिमुकला गंभीर जखमी झाला होता.

Crime News (AI Photo)

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बापाने क्रूरतेच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या

point

कौटुंबिक वादातून सहा महिन्याच्या बाळाला फरशीवर आदळलं

Crime News : झारखंडच्या हजारीबाग येथे बापाने क्रूरतेच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. कौटुंबिक वादातून आरोपीने सहा महिन्याच्या बाळाला उचलून फरशीवर आदळलं. हैवान बापाच्या या क्रूरतेनं चिमुकला गंभीर जखमी झाला होता. नंतर आई आपल्या मुलाला घेऊन रुग्णालयात घेऊन गेली होती. मात्र आरोपीने नवऱ्याने चिमुकल्यावर उपचार करण्यास विरोध केला होता. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : योजनेच्या पैशांवरून नवरा-बायकोत वाद, पतीनं पत्नीची जीभ तोडली

क्रूर बापाने चिमुकल्या जीवाला फरशीवर आदळलं

आईची निराली कुमार अशी ओळख समोर आली आहे, तर 25 ऑगस्ट महिन्यात सकाळी 8 वाजता कौटुंबिक वादाला घेऊन त्यांची सासू कांती देवी तिच्यासोबत शिवीगाळ करत होती. सासू-सुनेदरम्यान वाद झाला होता. याचदरम्यान निराली कुमारीचा पती आकाश कुमार हा रागात होता. त्याने रागाच्या भरात सर्व मर्यादा ओलांडून चिमुरड्या जीवाला फरशीवर आदळलं.

या प्रकरणात चिमुरडा गंभीर जखमी झाला होता. अनेकदा विनंती करूनही पतीने मुलाला रुग्णालयात नेण्यास नकार दिला होता. त्यानंतर, आईने एका अज्ञात व्यक्तीच्या मदतीने जखमी झालेल्या मुलाला शेख भिखारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

रुग्णालयात घेऊन जाताना दुर्दैवी अंत 

संबंधित प्रकरणात प्राथमिक उपचारानंतर, शेख भिखारी मेडिकल कॉलेज रुग्णालयातील डॉक्टरांनी मुलाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती दिली. पीडित व्यक्तीने कसाबसा मुलाला रांचीच्या रिम्ममध्ये पाठवण्यात आले होते, मात्र वाटेतच चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

हे ही वाचा : NEET विद्यार्थिनीने संपवलं जीवन, लहान बहिणीने दरवाजा उघडताच बसला धक्का

ग्रामस्थांनी या घटनेचा तीव्रपणे निषेध केला आहे. पोलीस प्रशासनाने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. या घटनेची माहिती मिळताच, आईच्या अर्जाच्या अधारे कटकमसंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.