रक्षाबंधनापूर्वी दोन बहिणींची हत्या, काहीच मिनिटांत खेळ खल्लास

मुंबई तक

• 02:07 PM • 26 Aug 2026

Crime News : रक्षाबंधन सणाच्या आधी मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला. भावानेच आपल्याच दोन सख्ख्या बहि‍णींवर गोळीबार करत हत्या केली. आरोपीचा दाजी देखील या गोळीबारात गंभीर दुखापतग्रस्त झाला.

Crime News (AI Photo)

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

भावाने बहिणींसह दाजीवर केला गोळीबार 

point

घटनेनं भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला हादरवून सोडलं

Crime News : उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यात रक्षाबंधन सणाच्या आधी मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला. भावानेच आपल्याच दोन सख्ख्या बहि‍णींवर गोळीबार करत हत्या केली. आरोपीचा दाजी देखील या गोळीबारात गंभीर दुखापतग्रस्त झाला. घडलेल्या घटनेनुसार, भावाला आपल्याच बहिणींच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे भावाने असे कृत्य करत त्यांची हत्या केली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Astrology : 28 ऑगष्ट रोजी शेवटचं चंद्रग्रहण, 'या' राशींना सतर्कतेचा इशारा

भावाने बहिणींसह दाजीवर केला गोळीबार 

सुमारे 10 ते 15 मिनिटांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं पोलीस देखील हादरून गेले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी विवेक कुमार मंगळवारी रात्री सर्वात आधी त्याची बहीण पुष्पाच्या घरी आला आणि त्याने तिच्यावर गोळीबार केला. नंतर तोच भाऊ दुसरी बहीण शकुंतलाच्या घरी गेला होता. त्याचदरम्यान तिच्या पतीवर गोळीबार करण्यात आला. 

घटनेनं भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला हादरवून सोडलं

दोन्ही बहि‍णींच्या मृत्यूच्या घटनेनं परिसर हादरून गेला. दरम्यान, जखमी झालेल्या दाजीला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, सध्या त्याची प्रकृती ही सध्या गंभीर आहे. या दोन्ही घटनांमध्ये सुमारे 10 ते 15 मिनिटांचे अंतर ठेवण्यात आले होते. याच रक्षाबंधन सणापूर्वी घडलेल्या या खळबळजनक घटनेनं भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला हादरवून सोडले आहे. 

हे ही वाचा : उकळत्या कढईत पडून 25 वर्षीय मजुराचा मृत्यू, युपीच्या कामगाराचा महाराष्ट्रात दुर्दैवी अंत

या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांच्या जवळच्या रहिवाशांची चौकशी सुरू केली. दोन बहि‍णींच्या हत्या करून आरोपी विकीने घटनास्थळावरून पळ काढला होता. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे गोळा केले होते. नंतर जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्डिंगची तपासणी केली होती.