बस स्टँडवर घडली थरारक घटना! भररस्त्यात महिलेवर चाकूने वार अन् मुलगी तर... पतीने पत्नीसोबत असं का केलं?

एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर दिवसाढवळ्या भररस्त्यात चाकूने वार करत तिची निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे.

भररस्त्यात महिलेवर चाकूने वार अन् मुलगी तर...

भररस्त्यात महिलेवर चाकूने वार अन् मुलगी तर...

मुंबई तक

• 11:27 AM • 24 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भररस्त्यात महिलेवर चाकूने वार अन् मुलगी तर...

point

पतीने पत्नीसोबत असं का केलं?

Crime News: बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर दिवसाढवळ्या भररस्त्यात चाकूने वार करत तिची निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. प्रकरणातील मन हेलावून टाकणारी बाब म्हणजे, ही सर्व घटना आरोपी पती आणि पीडितेच्या 12 वर्षांच्या मुलीसमोर घडली. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

हत्येमागचं नेमकं कारण काय? 

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिलेचं नाव रेखा असून आरोपी पतीचं नाव लोकेश असल्याचं समोर आलं आहे. दोघांच्या लग्नाला केवळ तीन महिने झाल्याचं सांगितलं जात आहे. लग्नानंतर काही दिवस दोघांमध्ये सतत भांडणं व्हायची. आपल्या पत्नीचे दुसऱ्याच पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा लोकेशला संशय होता. तसेच, तो रेखाला नेहमी दोघांनाही एकत्र राहता यावं, यासाठी तिने तिच्या पहिल्या लग्नातून झालेल्या मुलीला दूर पाठवण्याचा सल्ला द्यायचा. पण रेखा हे मान्य करण्यास तयार नव्हती. यामुळे त्यांच्यात दररोज वाद व्हायचे. 

हे ही वाचा: 'त्या' रात्री विवाहिता दाजीसोबतच झाली फरार! पती रडत-रडत थेट पोलिसात... नेमकं काय घडलं?

बस स्टँडवर केला पत्नीवर हल्ला

घटनेच्या दिवशी रेखा तिच्या मुलीसोबत सुंकदकट्टे बस स्टँडवर होती. तेव्हा तिथे अचानक रेखाचा पती लोकेश पोहोचला आणि त्यावेळी दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. कालांतराने, त्यांच्यातील भांडण टोकाला पोहाचलं. आपली पत्नी आपल्याला धोका देत असल्याच्या संशयातून आरोपीने रेखावर हल्ला करण्यासाठी खिशातून चाकून बाहेर काढला. त्यानंतर, लोकेशने रेखावर चाकूने कित्येक वार केले. महिला रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडली. त्यावेळी, 12 वर्षांची मुलगी मात्र रस्त्यावर रडत- ओरडत होती. घटनेनंतर, तातडीने स्थानिक आणि तिथल्या पोलिसांनी रेखाला जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र, गंभीर जखमा झाल्याने उपचारादरम्यान पडितेचा मृत्यू झाला.

हे ही वाचा: India Today Conclave Mumbai 2025: समजून घेऊया नवं वास्तव!

पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात

हत्येनंतर लोकेश घटनास्थळावरून पळून के.आर. मार्केटच्या दिशेने गेला. पोलिसांनी लगेच आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आणि काही काळातच कामाक्षी परिसरात पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. चौकशीदरम्यान, लोकेशने आपला गुन्हा कबूल केला आणि अनैतिक संबंधाचा संशय तसेच मुलीवरून झालेल्या वादातून त्याने हे मोठं पाऊल उचलल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून सध्या, प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. 

    follow whatsapp