Extramarital affairs : उत्तर प्रदेशातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याचं वृत्त आहे. एका महिलेनं आपल्या तीन वर्षाच्या मुलीला सोडून दिलं आणि तिनं आपल्या पुतण्यासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. तिचा पती हा सौदी अरेबियात काम करत होता. या प्रकरणाची माहिती महिलेच्या दिराकडूनच समजली होती. या प्रकरणादरम्यान, पोलीस ठाण्यात एक औपचारिकता म्हणून तक्रार दाखल करण्यात आल्याचं वृत्त आहे. पतीचं नाव मन्नू गुप्ता (वय 31) असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : अंगारका चतुर्थी दिवशी 'या' राशींना मोठा अडथळा निर्माण होणार, तर काहींचं प्रेम, नोकरी संकटात येणार
नेमकं काय घडलं?
दैनिक भास्कर या वृत्तानुसार, पती मन्नू गुप्ता यांनी दावा केला की, त्यांची पत्नी घरातून 10 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली होती. मन्नू गुप्ता यांनी चार वर्षांपूर्वी पूजा देवीशी विवाह केला होता. त्यांना तीन वर्षांची चिमुरडी देखील होती. मन्नूच्या मते, पूजा ही गेल्या दोन वर्षांपासून आपला भाचा चंदन गु्प्तासोबत नातेसंबंधात होती. तो म्हणाला की, 'मी तिला अनेकदा समजावलं, पण तिने कधीही ऐकलं नाही. तिने सोशल मीडियावर त्याच्यासोबतचे फोटो शेअर केले होते. तिने आमच्या मुलीचे आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त केले', असा आरोप भाच्याने केला होता.
मुलीसाठी 10 लाखांची जमवली होती संपत्ती
मन्नूने पुढे स्पष्ट केलं की, तो परदेशात काम करतो आणि नियमितपणे घरी पैसे पाठवायचा. तसेच मुलीच्या भविष्यासाठी 10 लाख रुपयांची बचत देखील केली होती, पण पूजाने सर्व बचत केलेली रक्कम तसेच दागिन्यांसह ऐवज आपल्यासोबत नेल्याचा कुटुंबाने आरोप केला आहे.
मन्नूचा मोठा भाऊ जितेंद्रने यापूर्वी पूजा आणि चंदनला रंगेहाथ पकडले होते. तसेच कलंकाच्या भीतीने कुटुंबाने हे प्रकरण बाहेर काढले नाही. चंदन या जोडप्याच्या घरापासून केवळ 150 मीटर अंतरावर राहतो आणि पूजा ही तिथूनच गायब झाल्याचं वृत्त आहे.
घरातून रोख रक्कम आणि दागिने गायब
या घटनेनंतर काही दिवसांमध्ये मन्नू परत आला तेव्हा त्याला रोख रक्कम आणि दागिने गायब झाल्याचे आढळून आले आणि त्याने ताबडतोब जिल्हा मुख्यालयापासून 60 किमी अंतरावर असलेल्या बंकाट पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. मन्नू म्हणाला की, त्याची मुलगी ही अस्वस्थ होती आणि वारंवार तिच्या आईबाबत सतत विचारायची.
हे ही वाचा : नागपुरात खळबळ! गर्लफ्रेंडवर कमेंट केली, संतापलेल्या प्रियकराने मित्राचाच काढला काटा...
दरम्यान, या प्रकरणाबाबत गावकऱ्यांनी निषेध केला. लहान लेकराला असं वाऱ्यावर सोडून देणं हे अमानवी असल्याचं म्हटलं. दरम्यान, पुजाचे कुटुंबिया तिचा शोध घेत असल्याचं सांगण्यात येत आहे. पुजाचं शिक्षण हे इयत्ता सहावीपर्यंत असून मन्नूचे शिक्षण हे आठवीपर्यंत झाल्याचं सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











