नागपुरात खळबळ! गर्लफ्रेंडवर कमेंट केली, संतापलेल्या प्रियकराने मित्राचाच काढला काटा...
तरुणांनी मिळून आपल्याच मित्राची हत्या केल्याचं वृत्त आहे. संबंधित प्रकरण हे शहरातील पार्वतीनगर परिसरातील असल्याची माहिती आहे. खरं तर, एका तरुणाने त्याच्या मित्राच्या प्रेयसीवर कमेंट केली आणि त्यानंतर, मित्रांमध्ये मोठा वाद झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गर्लफ्रेंडवर कमेंट केल्याने मित्रांमध्ये वाद
संतापलेल्या प्रियकराने आपल्याच मित्राचा काढला काटा...
नागपुरातील धक्कादायक घटना
Crime News: नागपूरच्या कलमना परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे तरुणांनी मिळून आपल्याच मित्राची हत्या केल्याचं वृत्त आहे. संबंधित प्रकरण हे शहरातील पार्वतीनगर परिसरातील असल्याची माहिती आहे. खरं तर, एका तरुणाने त्याच्या मित्राच्या प्रेयसीवर कमेंट केली आणि त्यानंतर, मित्रांमध्ये मोठा वाद झाला. काही वेळाने या वादाचं मारहाणीत रूपांतर झालं आणि यामध्ये एका 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. इतकेच नव्हे तर, उर्वरित 4 जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे.
मित्राला चिडवण्यासाठी त्याच्या प्रेयसीवर कमेंट...
पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री उशीरा ऋतिक पटेल नावाचा तरुण त्याच्या तनसू नागपुरे नावाच्या मित्रासोबत बाहेर गप्पा मारत बसला होता. त्यावेळी, त्याच परिसरात राहणार मुस्तफा उर्फ गोलू हा त्यांचा मित्र तिथे पोहोचला. त्याने दारू पिण्यासाठी त्याच्या दोन्ही मित्रांना सोबत येण्यास सांगितलं मात्र, पैसे नसल्याकारणाने ऋतिक आणि तनसूने गोलूला सोबत येण्यास नकार दिला. तरीसुद्धा मुस्तफा त्या दोघांना आपल्या बाईकवर बसवून घेऊन गेला आणि तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी दारू प्यायली. तिथून परतत असताना ऋतिक आणि मुस्तफा यांच्यामध्ये पैशांवरून वाद झाला. दरम्यान, ऋतिकने आपल्या मित्राला चिडवण्यासाठी त्याच्या प्रेयसीवर कमेंट केली. यामुळे, संतापलेल्या गोलूने मित्राला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली आणि दोघांना वाटेतच उतरवरून निघून गेला.
हे ही वाचा: बीडमध्ये थरार! मध्यरात्री दरवाजा तोडून घरात घुसले अन् महिलेसोबत घडलं भयंकर... नेमकं प्रकरण काय?
मित्राच्या डोक्यावर वार करत हत्या
मित्रांमधील वाद मिटवण्यासाठी ऋतिक आणि तनसू त्यांचा मित्र सलीम अन्सारीसोबत पार्वतीनगर चौकात पोहोचले. मात्र, ते प्रकरण आणखी चिघळलं. त्यांच्यामध्ये हाणामारी सुरू झाली आणि त्यावेळी, मुस्तफासह त्याच्या मित्रांनी ऋतिकवर हल्ला केला. अगदी सुनियोजित पद्धतीने चाकू आणि रॉडच्या मदतीने हा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये, ऋतिकच्या डोक्यावर वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
हे ही वाचा: थिएटरच्या वॉशरूममध्ये महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट; अल्पवयीन तरुणाचं घाणेरडं कृत्य! पोलिसात तक्रार अन्...
पोलिसांनी घटनेतील 5 आरोपी आणि एका अल्पवयीन तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ईशा हातीम अन्सारी, त्यांची मुलं मुस्तफा उर्फ गोलू अन्सारी, लुकमान अन्सारी, साहिल अन्सारी, सलाउद्दीन अन्सारी आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. तसेच या हल्ल्यात, तनसू नागपुरे, सलीम अन्सारी, संगीता नागपुरे आणि शिवप्रसाद नागपुरे गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.










