बीडमध्ये थरार! मध्यरात्री दरवाजा तोडून घरात घुसले अन् महिलेसोबत घडलं भयंकर... नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

बीडमध्ये रविवारी (4 जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी मोठी खळबळ माजवली. पाच ते सहा अज्ञात व्यक्तींनी घराचा दरवाजा जोरात लाथाडून आत प्रवेश केला, तसेच घरातील महिलेसोबत भयंकर कृत्य केलं.

ADVERTISEMENT

मध्यरात्री महिलेसोबत घडलं भयंकर...
मध्यरात्री महिलेसोबत घडलं भयंकर...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मध्यरात्री दरवाजा तोडून घरात घुसले अन्...

point

महिलेसोबत घडलं भयंकर!

point

बीडमधील धक्कादायक प्रकरण

Beed Crime: बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सराटेवडगावमध्ये एक थरारक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. रविवारी (4 जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात दरोडेखोरांनी मोठी खळबळ माजवली. पाच ते सहा अज्ञात व्यक्तींनी घराचा दरवाजा जोरात लाथाडून आत प्रवेश केला, तसेच घरातील महिलांना धमकावून आणि धारदार हत्यारे दाखवून कुटुंबियांना लुटलं. या भयानक घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 

मध्यरात्री दरोडेखोर दरवाजा तोडून आत घुसले अन्... 

मिळालेल्या माहितीनुसार, सराटेवडगावातील शेळके वस्तीवर ग्यानबा राजपुरे आणि बाळू राजपुरे हे दोन्ही भाऊ आपापल्या कुटुंबीयांसह राहतात. रविवारी त्यांच्या घरी चुलत्याच्या वार्षिक श्राद्धानिमित्त नातलग आणि पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभर पाहुण्यांची ये-जा सुरू असल्याने कुटुंबातील सदस्यांना थकवा जाणवला होता. रात्री सर्वजण गाढ झोपेत असताना, साधारण एक ते सव्वाएक वाजता पाच-सहा दरोडेखोरांनी ग्यानबा राजपुरे यांच्या घराचा दरवाजा लाथ मारून उघडला. 

हे ही वाचा: थिएटरच्या वॉशरूममध्ये महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट; अल्पवयीन तरुणाचं घाणेरडं कृत्य! पोलिसात तक्रार अन्...

पीडितेच्या छातीवर आणि मानेवर पाय ठेवून धमकी 

या अचानक झालेल्या आवाजाने घरातील लोक जागे झाले. दरम्यान, ग्यानबा यांच्या आईने विरोध करत आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा निर्दयी दरोडेखोरांनी त्यांच्या छातीवर आणि मानेवर पाय ठेवून तिला जमिनीवर दाबले. आरोपींकडे मोठी हत्यारे होती. त्यांनी दांपत्याच्या कपाळावर हत्यार रोखून प्राणघातक धमक्या दिल्या आणि त्यांच्या अंगावरील सोन्याचे अलंकार हिसकावून घेतले. घरातून सोन्याचे दागिने तसेच काही रोख रक्कम लुटल्यानंतर, आोरोपींनी शेजारी राहणाऱ्या बाळू राजपुरे यांच्या घराकडे धाव घेतली. त्या घरातील सदस्यांना सुद्धा मारहाण करून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू आणि पैसे आरोपी तरुणांनी चोरून नेले. 

हे ही वाचा: पुणे: "माझ्या वडिलांची प्रकृती गंभीर..." इमर्जन्सी कॉलच्या बहाण्याने डॉक्टरांना बोलवलं अन् आरोपींचं भयंकर कृत्य!

या प्रकरणात दोन्ही कुटुंबातील सदस्यांना जखमा झाल्या आहेत. राजपुरे परिवाराने अंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा पूर्ण केला आणि अज्ञात आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा नोंदवला आहे. सध्या, या प्रकरणाचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असून आरोपींच्या शोधासाठी वेगवेगळी पथके देखील तयार करण्यात आली आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp