पुणे: "माझ्या वडिलांची प्रकृती गंभीर..." इमर्जन्सी कॉलच्या बहाण्याने डॉक्टरांना बोलवलं अन् आरोपींचं भयंकर कृत्य!
पुण्यात एका बनावट इमरजंसी कॉलच्या माध्यमातून उपचारांसाठी डॉक्टरांना बोलवून त्यांना लुटण्यात आल्याचं वृत्त आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी स्वत: गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं खोटं सांगून पीडित पीडित डॉक्टरांना उपचारांसाठी घटनास्थळी बोलवलं आणि नंतर चाकूचा धाक दाखवून त्यांच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इमर्जन्सी कॉलच्या बहाण्याने डॉक्टरांना बोलवलं अन्...
पीडित डॉक्टरांसोबत आरोपींचं भयंकर कृत्य!
Pune Crime: पुण्यातील सहकार नगर परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बनावट इमर्जन्सी कॉलच्या माध्यमातून उपचारांसाठी डॉक्टरांना बोलवून त्यांना लुटण्यात आल्याचं वृत्त आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी स्वत: गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं खोटं सांगून पीडित पीडित डॉक्टरांना उपचारांसाठी घटनास्थळी बोलवलं आणि नंतर चाकूचा धाक दाखवून त्यांच्यावर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, डॉक्टर गंभीररित्या जखमी झाले असून घटनेच्या वेळी आरोपी त्यांच्याकडून पैसे आणि त्याच्या मौल्यवान वस्तू घेऊन फरार झाले.
आरोपींनी योजना आखली अन्...
प्रकरणातील 49 वर्षीय पीडित डॉक्टरचं नाव डॉ. छाजेड असून ते बालाजी नगर परिसरात राहतात. संबंधित डॉक्टर एक स्थानिक क्लिनिक चालवत असून आवश्यकता असल्यास रुग्णांच्या घरी जाऊन इमरजंसी मेडिकल सेवा देखील पुरवतात. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डॉक्टरांची माहिती मिळवली आणि त्यानंतर, संबंधित घटनेची योजना आखली.
वडिलांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगून डॉक्टरांना घरी बोलवलं अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री जवळपास 9 वाजताच्या सुमारास आरोपींनी डॉक्टरांना फोन केला आणि आपल्या वडिलांची प्रकृती गंभीर असून त्यांना तात्काळ उपचारांची गरज असल्याचं खोटं सांगितलं. फोन करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवून डॉ. छाजेड पुणे-सातारा हायवेवरील शंकर महाराज मठाजवळ असलेल्या पत्त्यावर पोहोचले. मात्र, त्यावेळी दोन्ही आरोपींनी पीडित डॉक्टरांवर हल्ला केला.
हे ही वाचा: राज ठाकरेंना धक्का, नितेश राणेंनी खास माणूस फोडला, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर संतोष धुरींची पहिली प्रतिक्रिया
चाकूचा धाक दाखवून धमकी अन् मारहाण
आरोपींनी डॉक्टरांना चाकूचा धाक दाखवून त्यांना धमकावलं आणि मारहाण सुद्धा केल्याचा आरोप आहे. दरम्यान, स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात डॉक्टरांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर, डॉक्टरांची दुचाकी, त्यांच्या बॅगेत ठेवलेले 30,000 रुपये, मोबाईल फोन आणि चांदीचा ग्लास घेऊन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.










