Crime News: दिल्लीतील नोएडा सेक्टर-63 परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. इतकेच नव्हे तर हत्येनंतर त्याने स्वतःवर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी रक्तबंबाळ अवस्थेत असताना त्याला पोलिसांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, आरोपीची प्रकृती गंभीर असल्याकारणाने त्याला दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं.
ADVERTISEMENT
नवरा बायकोमध्ये वाद
एसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2011 मध्ये दिल्लीतील उत्तम नगर येथील 32 वर्षीय शीतलचा अलीगडमधील दादो येथील रहिवासी असलेल्या शेर सिंगशी विवाह झाला होता. लग्नाच्या वेळी शीतल अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली. लग्नाच्या 14 वर्षांच्या आतच शीतल आणि शेर सिंग यांना चार मुलं झाली. मात्र, शेर सिंगला दारूचं व्यसन होतं आणि यामुळे पती पत्नीमध्ये सतत वाद होत होते.
दुसऱ्या तरुणासोबत झाली जवळीक अन्...
काही वर्षांपूर्वी शीतल दिल्लीतील तिच्या घरी गेली आणि तिथे ती बराच काळ राहिली. यादरम्यान, शीतल दक्षिणपुरी येथील सुमित कुमार नावाच्या तरुणासोबत काम करू लागली. तिने सुमितच्या रुद्दीच्या गोदामात काम करण्यास सुरूवात केली. याच काळात, सुमित आणि शीतलमध्ये जवळीक वाढत गेली आणि त्यांच्या मैत्रिचं प्रेमात रूपांतर झालं.
हे ही वाचा: अल्पवयीन मुलीचं 3 नराधमांनी अपहरण केलं, गँगरेप करून जंगलात सोडलं! गावकरी संतापले अन् नंतर जे घडलं..
प्रियकरासोबत त्याच्या घरीच राहिली
यानंतर शेरसिंग सुद्धा पुन्हा दिल्लीला गेला आणि तिथे तो मजूर म्हणून काम करू लागला. पतीशी मतभेद झाल्यामुळे शीतल नोएडामध्ये सुमितसोबत राहू लागली. सुमितचे वडील कालीचरण यांनी त्यांच्या मुलासाठी 25 फुटा रोडवर 30 यार्डांचे घर विकत घेतले होते. शीतल आणि सुमित त्याच घरात राहत होते. दोन महिन्यांपूर्वी शेर सिंग शीतलला घटस्फोट देण्याच्या बहाण्याने अलिगडला घेऊन गेला. 12 जुलै रोजी शेर सिंग शीतलला रुग्णालयात घेऊन गेला असता शीतल संधी साधून तिथून पळून गेली आणि पुन्हा सुमितसोबत राहू लागली. त्यानंतर ते दोघेही काही दिवसांसाठी हरिद्वारला गेले आणि तेथून दिल्लीला गेले. बुधवारी 16 जुलै रोजी ते दोघे पुन्हा आपल्या घरी आले.
पतीने प्रियकराच्या घरी जाऊन केला हल्ला
गुरुवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास सुमितच्या घराची वीज गेली. त्यावेळी सुमित आणि शीतल घराबाहेर असलेल्या स्लॅबवर बसून गप्पा मारू लागले. नंतर 8:15 वाजता शेरसिंग चेहरा झाकून सुमितच्या घरात शिरला आणि त्याने सुमितच्या कमरेवर चाकूने वार केला. पहिल्याच हल्ल्यात सुमित रक्तबंबाळ होऊन खाली पडला. त्याने सुमितच्या शरीरावर इतर ठिकाणी सुद्धा वार केले. त्यावेळी शीतल जोरजोरात ओरडू लागली आणि तिचा आवाज ऐकून घटनास्थळी लोक गोळा झाले.
हे ही वाचा: विकृतीचं टोक! व्हॅन ड्रायव्हरने चार वर्षांच्या मुलीलाही सोडलं नाही, बसमध्येच केलं लैंगिक शोषण, गुप्तांगाला झाल्या वेदना
स्वत:वर वार करत आत्महत्येचा प्रयत्न
मात्र, सुमितवर हल्ला केल्यानंतर शेर सिंगने स्वतःवर चाकूने अनेक वार केले आणि घरापासून थोडं लांब अंतरावर गेल्यावर शेर सिंग बेशुद्ध पडला. तिथल्या लोकांनी तातडीने पोलिसांना याबद्दल कळवलं. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी सुमित आणि शेर सिंग दोघांनाही जिल्हा रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी सुमितला मृत घोषित केले.
पोलिसांच्या चौकशीत शीतल गरोदर असून तिच्या पोटात सुमितचं बाळ वाढत असल्याची माहिती मिळाली. पत्नी गर्भवती असल्याचं कळताच शेर सिंगने सुमितच्या हत्येचा कट रचला. सुमितच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शेर सिंगविरुद्ध हत्येच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
