'व्हॅलेंटाइन डे'ला होणाऱ्या नवऱ्यासोबत वाद... IIT मध्ये कार्यरत असलेल्या महिला टेक्निशिअनने संपवलं आयुष्य

'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी फोनवर आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी भांडण झाल्यानंतर IIT कॅम्पसमध्ये कार्यरत असलेल्या महिला ज्युनिअर टेक्निशिअनने फाशी घेऊन आत्महत्या केली.

'व्हॅलेंटाइन डे'ला होणाऱ्या नवऱ्यासोबत वाद...

'व्हॅलेंटाइन डे'ला होणाऱ्या नवऱ्यासोबत वाद...

मुंबई तक

• 06:00 AM • 16 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

'व्हॅलेंटाइन डे'ला होणाऱ्या नवऱ्यासोबत वाद...

point

IIT मध्ये कार्यरत असलेल्या महिला टेक्निशिअनने संपवलं आयुष्य

Suicide Case: आयआयटी (IIT) कानपूरमध्ये आत्महत्येचं आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी फोनवर आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी भांडण झाल्यानंतर IIT कॅम्पसमध्ये कार्यरत असलेल्या महिला ज्युनिअर टेक्निशिअनने फाशी घेऊन आत्महत्या केली. 

हे वाचलं का?

पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह... 

कॅम्पस कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि खोलीचा दरवाजा तोडून पंख्यावर लटकलेल्या अवस्थेतील मृतदेह खाली उतरवण्यात आला. त्यानंतर, पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तपासादरम्यान, मृतदेहाजवळ एक डायरी सुद्धा सापडली असून त्यात शायऱ्या लिहिल्याचं दिसून आलं आहे. 

होणाऱ्या नवऱ्यासोबत वाद झाला अन्... 

वृत्तानुसार, 26 वर्षीय पीडितेचं नाव अंजू कुमारी असून ती  IIT मध्ये मागील 3 वर्षांपासून ज्युनिअर टेक्निशिअन म्हणून कार्यरत होती. कॅम्पसमधील कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार, पंकज नावाच्या तरुणासोबत अंजूचं लग्न ठरलं होतं आणि काही दिवसांनंतर त्यांचा साखरपुडा होणार होता. लग्न ठरल्यानंतर, दोघांचं एकमेकांशी फोनवर बोलणं सुरू झालं. शनिवारी सकाळी अंजू तिच्या खोलीत तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत होती. दरम्यान, कोणत्या तरी कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि त्यावेळी अंजूला तिचा नवरा जोरात ओरडला. त्यानंतर, आपण आत्महत्या करणार असल्याचं सांगून तिने फोन कट केला आणि काही वेळानंतर, तिने खोलीतील पंख्याला फाशी घेत स्वत:चं आयुष्य संपवलं. 

हे ही वाचा:  होणाऱ्या नवऱ्याच्या फोनमध्ये दुसऱ्या मुलीचा फोटो पाहिला... संतापलेल्या तरुणीच्या कृत्यामुळे होत्याचं नव्हतं झालं

त्यानंतर, तातडीने अंजूच्या नवऱ्याने कॅम्पसमधील त्याचा मित्र सूरजला याबाबत सांगितलं आणि इतर कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती देण्यात आली. अंजूला खोलीजवळ गेल्यानंतर, तिला सर्वांना हाक मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळानंतर, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडला. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि अंजूचा फाशीला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. आता, पीडितेचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून पोलीस सर्व बाजूंनी प्रकरणाचा तपास करत आहेत. 

    follow whatsapp