Ashwajit Gaikwad Priya Singh Case : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांचा पुत्र अश्वजित गायकवाडला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रेयसीला मारहाण आणि गाडीने धडक देऊन जखमी केले होते. या प्रकरणात टीका झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी (17 डिसेंबर) रात्री 8.30 वाजता अश्वजितसह तिघांना अटक केली. (ashwajit gaikwad and two others arrested by thane police in priya singh case)
ADVERTISEMENT
‘एमएसआरडीसी’चे संचालक अनिल गायकवाड यांचा मुलगा अश्वजित गायकवाडवर प्रिया सिंग या 26 वर्षीय तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. ठाण्यातील घोडबंदर भागातील वाघबीळ परिसरात 26 वर्षीय पीडिता प्रिया सिंग राहते. अश्वजित गायकवाडसोबत साडेचार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा दावा तिने केला आहे.
प्रिया सिंगसोबत काय घडलं?
11 डिसेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता अश्वजितने घोडबंदर येथील एका हॉटेलजवळ भेटण्यास बोलवलं होतं. तिथे दोघांमध्ये वाद झाला. रागात अश्वजितने प्रियाच्या अंगावर गाडी घालायला सांगितले. चालकानेही त्याचे ऐकत तिच्या अंगावर गाडी घातली. यात ती गंभीर जखमी झाली. झालेल्या प्रकारानंतर आरोपी फरार झाले, असे प्रिया सिंगने म्हटलेलं आहे.
हेही वाचा >> “…त्याचाच एकनाथ शिंदेंनी फायदा घेतला”, ठाकरेंच्या वकिलांनी काढला मुद्दा
एका व्यक्तीने तिला जखमी अवस्थेत पाहिलं आणि याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रिया सिंगने अश्वजितवर आरोप केले असून, कासारवडली पोलिसांनी अश्वजितसह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. दुखापत करणे, बेफिकीरपणे वाहन चालवणे, इतरांच्या जीविताला धोका निर्माण करून दुखापत करणे, धमकावणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
दोन गाड्याही जप्त
मात्र हत्येचा प्रयत्न केल्याचे कलम दाखल करण्यात यावे, अशी मागणी प्रिया सिंगकडून केली जात आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारलाही लक्ष्य केले असून, पोलिसांनी रविवारी (17 डिसेंबर) रात्री अश्वजित गायकवाड, रोमिल पाटील आणि सागर शेडगे या तिघांना अटक केली. गुन्ह्यात वापरलेली दोन चारचाकी वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत.
ADVERTISEMENT
