मटणाचा बेत केला, दारु पाजली अन् सासऱ्याची केली हत्या; जावयाने घरी बोलवून उगवला सूड

Crime News : एका जावयाने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी स्वतःच्या सासऱ्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. 60 वर्षीय कैलाश गिरी गोस्वामी 28 जानेवारी रोजी आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते. 30 जानेवारी रोजी जेव्हा ते घरी जाण्यास निघाले, तेव्हा त्यांच्या मुलीने पती अशोक गिरी याला मटण आणण्यास सांगितले. घरात मटणाचा बेत झाला, सर्वांनी एकत्र जेवण केले, पण आपल्या आयुष्यातील हे शेवटचे जेवण असेल याची कल्पना खुद्द कैलाश गिरी यांनाही नव्हती.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 12:26 PM • 11 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मटणाचा बेत केला, दारु पाजली अन् सासऱ्याची केली हत्या

point

जावयाने घरी बोलवून उगवला सूड

Crime News : एका जावयाने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी स्वतःच्या सासऱ्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. 60 वर्षीय कैलाश गिरी गोस्वामी 28 जानेवारी रोजी आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेले होते. 30 जानेवारी रोजी जेव्हा ते घरी जाण्यास निघाले, तेव्हा त्यांच्या मुलीने पती अशोक गिरी याला मटण आणण्यास सांगितले. घरात मटणाचा बेत झाला, सर्वांनी एकत्र जेवण केले, पण आपल्या आयुष्यातील हे शेवटचे जेवण असेल याची कल्पना खुद्द कैलाश गिरी यांनाही नव्हती. मध्य प्रदेशातील बालाघाट येथील ही घटना आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई: दिवसाढवळ्या 19 वर्षीय तरुणीवर गोळ्या झाडून खून... प्रेमत्रिकोणातून भयंकर हत्याकांड! शिवाजीनगरमध्ये खळबळ

दारु पिण्याच्या बहाण्याने घराबाहेर

जावई अशोक गिरी आणि त्याचा साडू रुस्तम गिरी यांनी पूर्वनियोजित कटानुसार कैलाश गिरी यांना दारु पिण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेले. वृद्ध कैलाश गिरी पूर्णपणे नशेत बुडाल्यानंतर, या दोघांनी त्यांना जवळच्याच जंगलात नेले. तिथे त्यांना दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली आणि शेवटी गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह जंगलात ओढत नेऊन एका निर्जन ठिकाणी फेकून दिला आणि तेथून पसार झाले.

संशय येऊ नये म्हणून केले नाटक

स्वतःवरचा संशय टाळण्यासाठी जावई अशोकने 29 जानेवारी रोजी स्वतः परसवाडा पोलीस ठाण्यात जाऊन सासरे बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलीस तपासात तो सहकार्य करण्याचे नाटक करत राहिला, जेणेकरून कोणालाही त्याचा संशय येऊ नये. मात्र, 3 फेब्रुवारी रोजी जंगलात वृद्ध व्यक्तीचा छिन्नविछिन्न मृतदेह सापडला आणि शवविच्छेदन अहवालात त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी कुटुंबातील सदस्यांची कसून चौकशी सुरू केली.

हे ही वाचा : पुणे : बुधवार पेठेत मध्यरात्रीच पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन; अनेकांची उडाली तारांबळ, नेमकं काय घडलं?

वडिलांच्या हत्येचा बदला

पोलिसांनी जेव्हा दोन्ही जावयांची चौकशी केली, तेव्हा त्यांच्या जबाबात वारंवार विसंगती आढळली. पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर अशोकने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, 'सासऱ्याने पूर्वी माझ्या वडिलांची हत्या केली होती, त्याचाच बदला घेण्यासाठी मी हे पाऊल उचलले.' हत्येनंतर अशोकने सासऱ्याचे कपडे आणि सामान आपल्या वडिलांच्या समाधीजवळ नेऊन जाळले होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदर्शकांत शुक्ला यांनी सांगितले की, दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयाने त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
 

    follow whatsapp