'मधुचंद्राच्या रात्री...,' नवविवाहितेची नको तीच अट, नवरदेवाला फुटला घाम, पुढं भयंकर घडलं

मुंबई तक

• 03:46 PM • 13 Apr 2026

Crime News : नवविवाहितेनं आपल्या पतीकडे मधुचंद्राच्या रात्री 90 लाख रुपयांची मागणी केली होती. तिला पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला, ती एवढ्यावर न थांबता संपूर्ण सासरच्या मंडळींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. 

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

'लग्नाच्या पहिल्या रात्री 90 लाख दिले तर शरीरसंबंध ठेवेन' नवऱ्याला फुटला घाम

point

वधूने गोंधळ घालत आई वडिलांना बोलावले

point

पुढे भयंकर घडलं

Crime News : ताजनगरीच्या जगदीशपुरा पोलीस ठाणे परिसरात एक धक्कादायक घटना घडली. ज्यामुळे वैवाहिक बिघडलं आहे. नवविवाहित महिलेनं आपल्या पतीकडे मधुचंद्राच्या रात्री 90 लाख रुपयांची मागणी केली होती. तिला पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिला, ती एवढ्यावर न थांबता संपूर्ण सासरच्या मंडळींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : कल्याण-मुरबाड महामार्गावर भीषण अपघात, ईको कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत 11 जणांचा दुर्दैवी अंत

'लग्नाच्या पहिल्या रात्री 90 लाख दिले तर शरीरसंबंध ठेवेन' नवऱ्याला फुटला घाम

हे प्रकरण सिकंदरा भागातील महिला डॉक्टरच्या भावाचे आहे. डॉक्टरच्या म्हणण्यांनुसार, त्यांच्या भावाचे हाथरस येथील तरुणीशी विवाह ठरला होता. निरोप समारंभात, वधू तिच्या सासरच्या घरी आली असता, तिने पहिल्याच रात्री तिच्या पतीला आश्चर्याचा धक्का बसला. तिचे याबाबत असं स्पष्ट सांगणं होतं की, तिला हे लग्न आवडले नाही आणि ती फक्त पैशांच्या हेतून आली आहे. तिने अट घातली की, 'तिला 90 लाख रुपये रोख रक्कम दिले तरच ती वैवाहिक जीवन पुढे चालू ठेवेल. मला लग्नाच्या रात्री 90 लाख रुपये दिले तर मी शरीरसंबंध ठेवेन,' हे ऐकून नवऱ्याला घाम फुटला. 

वधूने गोंधळ घालत आई वडिलांना बोलावले

जेव्हा पती आणि सासरच्या मंडळींनी एवढी मोठी रक्कम देत असमर्थता दर्शवली होती, तेव्हा त्यांच्यात वाद वाढला होता. दरम्यान, असे म्हटले जातेय की, वधूने गोंधळ घातला आणि तिच्या आई वडिलांना बोलावले. तरुणीचे कुटुंबीय काही गुंडांना घेऊन आले आणि त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावत कुटुंबाला ओलीस ठेवले.  

वविवाहितेनं सासूचे दागिने आणि इतर सामान घेऊन ती माहेरी गेली

नवऱ्या मुलाच्या कुटुंबीयांनी आरडाओरड केली असता, शेजाऱ्यांच्या मदतीने कसाबसबा जीव वाचवण्यात यश मिळवले. या घटनेनं परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र होतं. पण, अशा परिस्थितीत नवविवाहितेनं सासूचे दागिने आणि इतर सामान घेऊन ती माहेरी पळून गेली. 

हे ही वाचा : मोठी बातमी : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांच्या बहिणीची गेल्या 3 तासांपासून चौकशी सुरु

पीडित कुटुंबाच्या आरोपानुसार, जगदीशपुरा पोलिसांनी सुरुवातीला तक्रारीकडे दुर्लक्ष केले. अखेर पीडित डॉक्टरने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या कडक आदेशानंतर, पोलिसांनी आता वधू, तिचे वडील आणि इतर साथीदारांविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला.