बीड : पीएसआय मध्यरात्री घरात घुसला, अन् विवाहित महिलेवर केला बलात्कार

मुंबई तक

• 12:53 PM • 23 Sep 2026

बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पोलीस उपनिरीक्षकाने विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी त्या पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Beed Crime

Beed Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पीएसआय मध्यरात्री घरात घुसला

point

अन् विवाहित महिलेवर केला बलात्कार

Beed Crime, रोहिदास हातागळे : बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली असून, पोलिसांवरच गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. वडवणी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले श्रेणी पोलीस उपनिरीक्षक गणेश राठोड यांच्या विरोधात एका विवाहित महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रक्षकच भक्षक बनल्याच्या या घटनेमुळे संपूर्ण वडवणी शहरात व तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

हे वाचलं का?

मध्यरात्री घरात घुसला अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना 19 सप्टेंबर 2026 रोजी मध्यरात्री 1 ते 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेवेळी पीडित महिला घरात एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत आरोपी गणेश राठोड याने अचानक तिच्या घरात घुसखोरी केली आणि महिलेच्या संमतीविना तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला, असा स्पष्ट आरोप पीडितेने आपल्या तक्रारीत केला आहे.

हे ही वाचा : पुणे : इंजिनिअरने गरोदर पत्नीला गळा चिरुन संपवलं, अन् दुसऱ्या मजलीवरुन मारली उडी, कारण काय?

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

या गंभीर प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीच्या आधारे संशयित आरोपी गणेश राठोड (रा. पोलीस ठाणे परिसर, वडवणी, ता. वडवणी, जि. बीड) याच्याविरुद्ध वडवणी पोलीस ठाण्यात त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(2)(a)(1) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी प्रकरणाची अधिकृत नोंद घेतली आहे.

हे ही वाचा : गच्चीवर मृतदेह, एकटी मुलगी, घरात सापडले 900 फिंगर प्रिंट्स, आरोपी आहे कुठे?

राठोड पोलीस ठाण्यात गैरहजर

विशेष म्हणजे, सदर घटना घडल्यापासून आरोपी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक राठोड हे पोलीस ठाण्यात हजर झालेले नाहीत. प्रकरणातील सर्व बाबींचा आणि पुराव्यांचा सखोल तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती वडवणी पोलिसांकडून देण्यात आली आहे.