पती ब्युटी पार्लरवालीच्या प्रेमात, पत्नीने प्रेयसीचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले

मुंबई तक

• 06:10 PM • 23 Sep 2026

Salem suitcase murder case : सेलममधील पाच वर्षे जुन्या सूटकेस हत्याकांडाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. पतीच्या संबंधांच्या संशयातून बांगलादेशी महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे सूटकेसमध्ये भरण्यात आल्याचा आरोप आहे.

Salem suitcase murder case

Salem suitcase murder case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पती ब्युटी पार्लरवालीच्या प्रेमात

point

पत्नीने प्रेयसीचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले

Salem suitcase murder case : तमिळनाडूतील सेलम शहरात 2021 मध्ये घडलेल्या बहुचर्चित सूटकेस हत्याकांडाचा तब्बल पाच वर्षांनी उलगडा झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेला सलेम शहर पोलिसांनी महाराष्ट्रातील पुणे येथून अटक केली आहे. निशी असे आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिला आणि आरोपी महिला या दोघीही बांगलादेशातील रहिवासी आहेत. त्या बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाल्या होत्या. त्यानंतर ब्युटी पार्लर आणि मसाज पार्लरच्या नावाखाली त्या काम करत होत्या. 2021 मध्ये सेलम शहरात एका ब्युटी पार्लरच्या मालक महिलेची हत्या झाली होती. हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते एका सूटकेसमध्ये भरून बाहेर फेकण्यात आले होते. तपासादरम्यान मृत महिलेची ओळख बांगलादेशातील तेजमंडल अशी पटली.

हे वाचलं का?

हेही वाचा : अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर निवडणूक आयोगाचं भलं मोठं स्पष्टीकरण! नेमकं काय घडतंय?

लुबलू आणि तेजमंडल यांच्यात अनैतिक संबंध 

पोलिसांच्या तपासात तेजमंडल ही सलेममधील अथुर येथील प्रताप नावाच्या व्यक्तीसोबत ब्युटी पार्लर चालवत असल्याचे समोर आले. दोघेही कुमार सामीपत्ती येथे भाड्याच्या घरात पती-पत्नीप्रमाणे राहत होते. तेजमंडलने ब्युटी पार्लरमध्ये निशी, शीला आणि ओशी या काही बांगलादेशी महिलांना कामावर ठेवले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रतापचे या महिलांशी जवळचे संबंध होते. विशेषतः निशीसोबत त्याची जवळीक अधिक होती. या महिलांना योग्य मोबदला दिला जात नसल्याचा आरोपही तपासात समोर आला. याचदरम्यान निशीला तिचा पती लुबलू आणि तेजमंडल यांच्यात अवैध संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर निशीने तेजमंडलविरोधात बदला घेण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा : निवडणूक आयोगात नेमकं चाललंय तरी काय? मोठी खळबळ अन् आता 'ते' पत्रक!

पाच वर्षांनंतर हत्याकांडांमध्ये खुलासा 

पोलिसांच्या माहितीनुसार, ऑक्टोबर 2021 मध्ये प्रताप चेन्नईला गेला होता. त्यावेळी निशीने आपल्या चार साथीदारांसोबत मिळून तेजमंडलची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते सूटकेसमध्ये भरले. यानंतर आरोपींनी घरातील रोख रक्कम आणि दागिने घेतले आणि बांगलादेशात पळून गेले. दरम्यान, तेजमंडलचा मृतदेह जवळपास सात महिने शवागारात ठेवण्यात आला होता. तिच्या मृतदेहावर कोणीही दावा केला नाही. त्यानंतर पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. या हत्याकांडाचा तपास सुरू असतानाच मुख्य आरोपी निशी बांगलादेशात काही काळ राहिल्यानंतर पुन्हा भारतात आली आणि पुण्यात राहू लागली.

पोलिसांच्या माहितीनुसार, भारतात परतल्यानंतर निशीने आपली ओळख बदलली आणि कर्नाटकातील एका व्यक्तीसोबत लग्न केले. दोघेही एकत्र राहत होते. याचदरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे निशीचा शोध घेण्यात आला. त्यानंतर पुण्यात कारवाई करत पोलिसांनी तिला अटक केली. सध्या निशीला सेलम केंद्रीय कारागृहात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलीस आता आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षा दलाच्या मदतीने तपास करत आहेत. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या हत्याकांडातील मुख्य आरोपीला अटक झाल्यानंतर प्रकरणाचा तपास पुढे सुरू आहे.