Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल खून प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिने केतनच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांसमोर दुःख कसे व्यक्त करायचे आणि अधिक दुःखी कसे दिसायचे, याची माहिती चॅटजीपीटीवर शोधल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गुन्ह्यासाठी करण्यात आलेले हे पूर्वनियोजन तपासातील अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरत आहे. तसेच आरोपींनी लोणावळा परिसरातील दरीत पडून झालेल्या मृत्यूंचा आणि हत्याकांडांचा सखोल अभ्यास केल्याचे समोर आले आहे.
ADVERTISEMENT
दु:खी भावना कशा दाखवाव्यात?
केतनच्या मृत्यूनंतर केतनचे कुटुंबीय लोहगडच्या पायथ्याशी पोहोचले असता, तिथे सियाच्या चेहऱ्यावर दुःख दिसले नसल्याचा आरोप केतनच्या कुटुंबियांनी केला होता. तिच्या या वागण्यामुळे कुटुंबीयांचा तिच्यावरचा संशय अधिक बळावला. यानंतर घरी गेल्यावर कुटुंबासमोर दुःखी भावना कशा दाखवाव्यात आणि शोक कसा व्यक्त करावा, याबाबत सियाने सर्च केल्याचे पोलिसांना आढळून आले आहे.
हे ही वाचा : भाजपात निघालेल्या राहुल बोंद्रे यांना राहुल गांधी यांनी फोन करून कसं थांबवलं?
भक्कम डिजिटल पुरावे
या प्रकरणातील डिजिटल पुरावे अतिशय भक्कम असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. पोलिसांनी इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि स्नॅपचॅटवरील चॅट, ऑनलाइन सर्च केलेली माहिती आणि डिजिटल उपकरणांमधील इतर सर्व महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. हे सर्व पुरावे सविस्तर दोषारोपपत्रासोबत न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. या पुराव्यांवरून आरोपींनी गुन्ह्यासाठी आणि त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी कशाप्रकारे नियोजन केले होते, हे स्पष्ट होते.
हे ही वाचा : गच्चीवर मृतदेह, एकटी मुलगी, घरात सापडले 900 फिंगर प्रिंट्स, आरोपी आहे कुठे?
'Woman kill family by mushroom'
सियाने केतनला ठार करण्यासाठी केवळ दरीत ढकलण्याचाच नाही, तर इतर पर्यायांचाही इंटरनेटवर शोध घेतल्याचे समोर आले आहे. तसेच विषप्रयोग करुन केतनला संपवण्याचाही कट तिने रचला होता का असा प्रश्न समोर आला आहे. यासाठी कारण ठरले आहे ते तिने सर्च केलेल्या गोष्टी. पोलीस तपासात असे समोर आले आहे की, तिने 'Mushroom use woman kill family by mushroom', 'Is it easy to kill someone' आणि 'How to manipulate people' अशा स्वरूपाचे ऑनलाइन सर्च केले होते.
ADVERTISEMENT












