हात पकडून घरात ओढलं, 24 वर्षीय दिव्यांग महिलेवर लैंगिक अत्याचार

मुंबई तक

• 07:45 PM • 23 Sep 2026

Crime News : घरातून बाहेर पडताना एका 24 वर्षीय दिव्यांग महिलेवर तरुण शेजाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडितेचा हात पकडून तिला घरात ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आपल्या आई-वडिलांना सांगितली होती.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

हात पकडून महिलेला घरात ओढलं

point

दिव्यांग महिलेवर शेजारच्याकडून लैंगिक अत्याचार

Crime News : घरातून बाहेर पडताना एका 24 वर्षीय दिव्यांग महिलेवर तरुण शेजाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडितेचा हात पकडून तिला घरात ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आपल्या आई-वडिलांना सांगितली होती. कुटुंबीयांनी तिला पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांत तक्रार दाखल केली होती. ही घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील असून या घटनेनं परिसर हादरून गेला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : आई नातेवाईकांकडून घरी परतली, 18 वर्षीय लेकीचा बाथरूममध्ये मृतदेह

हात पकडून घरात ओढून 24 वर्षीय दिव्यांग महिलेवर अत्याचार 

शहरातील एका वस्तीत राहणारे त्या तरुणीचे वडील हे मंगळवारी कामासाठी दुकानात गेले होते. तिची आई औषध आणण्यासाठी डॉक्टरांकडे गेली होती. सायंकाळ होताच सुमारे साडे पाच वाजण्याच्या सुमारास ती तरुणी घर स्वच्छ करून कचरा टाकण्यासाठी बाहेर आली होती. याचदरम्यान, समोरच्या घरात एका तरुणाने तिचा हात पकडून तिला घरात ओढले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना आहे. 

हे ही वाचा : पती ब्युटी पार्लरवालीच्या प्रेमात, पत्नीने प्रेयसीचे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरले

पीडित मुलगी ही औषध घेऊन घरी परतली असता, तिने आईला संपूर्ण घटनेचा घटनाक्रम सांगितला. त्याच रात्री तिने वडील घरी परतल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला पोलीस ठाण्यात नेले होते. आरोपी तरुणाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. अशातच पोलीस तरुणीवरील लैंगिक अत्याचाराचा पुढील तपास करत आहेत. महिला, मुलींवर लैंगिक अत्याचार आणि छळाच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.