बीड : दुसरी बायको माहेरी गेली, सावत्र मुलीला पाहून बाप सैतान बनला, घरातच जबदरस्तीने लैंगिक अत्याचार

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील केज शहरात सावत्र पित्याने आपल्या 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Beed Crime News

Beed Crime News

मुंबई तक

13 Apr 2026 (अपडेटेड: 13 Apr 2026, 10:47 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीड : दुसरी बायको माहेरी गेली,

point

सावत्र मुलीला पाहून बाप सैतान बनला

point

घरातच जबदरस्तीने लैंगिक अत्याचार

Beed Crime News : बीड जिल्ह्यातील केज शहरात नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम सावत्र पित्याने आपल्याच 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून, यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील पीडित मुलीच्या आईने दोन मुली झाल्यानंतर, पहिल्या पतीसोबत पटत नसल्यामुळे 9 वर्षांपूर्वी त्याच्यापासून फारकत घेतली होती. त्यानंतर साधारण 8 वर्षांपूर्वी तिने या नराधम आरोपीशी दुसरे लग्न केले होते. या दुसऱ्या पतीपासून तिला एक मुलगा देखील झाला आहे. ही पीडित मुलगी आपल्या आईसोबत आणि आईने केलेल्या दुसऱ्या पतीसोबत एकाच घरात राहत होती. मात्र, ज्याच्यावर संरक्षणाची जबाबदारी होती, त्याच पित्याने मुलीच्या अगतिकतेचा फायदा घेत हे निंदनीय कृत्य केले आहे.

हे वाचलं का?

आई माहेरी जाताच नराधम सावत्र पित्याचे कृत्य

ही घटना 9 एप्रिल रोजी घडली, जेव्हा पीडित मुलीची आई सकाळी 11:30 वाजता आपल्या माहेरी गावाकडे गेली होती. यावेळी घरात केवळ पीडित मुलगी आणि तिचा लहान भाऊच हजर होते. दुपारी 12:30 च्या सुमारास सावत्र पिता घरी आला आणि त्याने मुलीकडे तिच्या आईबद्दल चौकशी केली. आई कधी परत येणार आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने मुलीला आईला फोन करायला लावला. आईने फोनवर परत यायला वेळ लागेल असे सांगितल्यानंतर, आरोपीने हे पाऊल उचलले. त्याने आपल्या साडेतीन वर्षांच्या लहान मुलाला विचलित करण्यासाठी त्याच्या हातात मोबाईल देऊन त्याला खाली बसवले. त्यानंतर मुलीला कॉटवर बसवून तिच्यासोबत लज्जास्पद चाळे करण्यास सुरुवात केली. मुलीने याला कडाडून विरोध केला आणि आईला सांगण्याची धमकी दिली, मात्र आरोपीने "आईला सांगायचे नसते, आपल्यात भांडणे होतील" असे धमकावत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला.

पीडितेने दिलेला धीर आणि पोलिसांत धाव

काही वेळाने पीडितेची आई माहेरून परत आली तेव्हा तिला आपली मुलगी कोपऱ्यात बसून रडताना दिसली. मुलगी प्रचंड घाबरलेली होती आणि ती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. आईने तिला अनेक वेळा विचारणा केली, मात्र भीतीपोटी ती गप्प राहिली. अखेर आईने तिला विश्वासात घेऊन मायेने विचारणा केल्यानंतर, मुलीने आपल्यासोबत घडलेल्या त्या काळ्या कृत्याची सर्व माहिती आईला सांगितली. पोटच्या मुलीवर झालेल्या या अन्यायामुळे आईला मोठा धक्का बसला आणि तिने तात्काळ पोलिसांत जाण्याचा निर्णय घेतला. नात्यातील विश्वास आणि सुरक्षितता या घटनेमुळे पूर्णपणे मोडीत निघाली असून, एका अल्पवयीन मुलीला स्वतःच्या घरातच ज्या नरकयातना भोगाव्या लागल्या, त्यामुळे समाजमन सुन्न झाले आहे.

पोलीस तक्रार आणि कायदेशीर कारवाई

याप्रकरणी 12 एप्रिल रोजी पीडित मुलीच्या आईने केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिच्या तक्रारीवरून सावत्र पित्याविरुद्ध गु. र. नं. 198/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 64 (3)(एफ), 65 (1) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 4 व 5 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके यांच्याकडून केला जात आहे. समाजात घडणारी अशी कृत्य ही नात्यांमधील ओलावा आणि विश्वास संपवणारी आहेत. आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात असे कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे. पोलिसांनी या नराधमाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बायको घरी नसताना चहा करायला बोलवले अन् साधला डाव, दवाखान्यात काम करणाऱ्या तरुणीसोबत डेंटिस्टने काय केलं?