Bihar Crime News : बिहारमधील बक्सर जिल्ह्यात एका 5 वर्षीय चिमुरडीसोबत घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण मुफस्सिल पोलीस स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे. रविवारी एका गावातील एका निर्माणाधीन इमारतीमध्ये ही चिमुरडी रडताना आढळली, ज्याचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तिथे पोहोचले असता या धक्कादायक घटनेचा उलगडा झाला. पीडित चिमुरडीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची अधिक माहिती घेतली असता, चिमुरडीवर अत्याचार करणारा आरोपी देखील अल्पवयीन असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला असला तरी अद्याप पोलीस ठाण्यात अधिकृतपणे गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, मात्र पोलीस सर्व बाजूने या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. एका निरागस मुलीसोबत घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ADVERTISEMENT
जुन्या वैमनस्यातून बालकाची गळा चिरून हत्या
दुसरी हृदयद्रावक घटना बिहारच्या सिमरी बख्तियारपूर क्षेत्रातील सिटानाबाद दक्षिण पंचायत अंतर्गत असलेल्या पठाण टोला वॉर्ड-7 मध्ये घडली आहे. येथे रविवारी संध्याकाळी जुन्या वैमनस्यातून 8 वर्षीय बालक मोहम्मद ओबेश याची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. मयत बालकाची आई सकीना खातून यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओबेश आपल्या घराशेजारील गाछीमध्ये खेळायला गेला असताना त्याच्यावर पूर्ववैमनस्यातून शेजाऱ्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ओबेशच्या मानेवर गंभीर जखम झाली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. आपल्या भावाचा जीव धोक्यात असल्याचे पाहून त्याची 12 वर्षीय मोठी बहीण कुदरती परवीन त्याला वाचवण्यासाठी धावून आली, मात्र या झटापटीत तिलाही हाताला दुखापत झाली असून ती जखमी झाली आहे.
हेही वाचा : बायको घरी नसताना चहा करायला बोलवले अन् साधला डाव, दवाखान्यात काम करणाऱ्या तरुणीसोबत डेंटिस्टने काय केलं?
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने रक्ताने माखलेल्या ओबेशला तातडीने सिमरी बख्तियारपूर येथील अनुमंडलीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. पोटच्या गोळ्याचा अशा भीषण अंत पाहून पालकांनी मोठा आक्रोश केला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्ला इतका भयानक होता की बालकाला वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. एका निरागस बालकाचा जीव जुन्या वादामुळे अशा प्रकारे घेतल्यामुळे परिसरात संतापाची लाट असून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. या घटनेमुळे पठाण टोला परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलिसांकडून आरोपींची धरपकड आणि तपास सुरू
या प्रकरणाची माहिती मिळताच एसडीपीओ मुकेश कुमार ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्राथमिक तपासात हे प्रकरण स्पष्टपणे हत्येचे असल्याचे दिसून येत असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या सर्व पैलूंची बारकाईने चौकशी केली जात असून आरोपीला अटक करण्यासाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू करण्यात आली आहे. दोषींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन एसडीपीओ यांनी दिले आहे. बिहारमध्ये एकाच दिवशी घडलेल्या या दोन भीषण घटनांमुळे मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस सध्या दोन्ही प्रकरणांतील आरोपींचा शोध घेत असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
बीड : दुसरी बायको माहेरी गेली, सावत्र मुलीला पाहून बाप सैतान बनला, घरातच जबदरस्तीने लैंगिक अत्याचार
ADVERTISEMENT











