42 वर्षीय पुरुषाचा पत्नीच्या मित्रावर अवैध प्रेमसंबंधाचा संशय, नवऱ्याने बायकोच्या मित्राला जागीच संपवलं

Crime News : गोकुळपुरी येथे एका 42 वर्षीय पुरुषाने आपल्या पत्नीच्या मित्रावर अवैध प्रेमसंबंधाचा संशय व्यक्त करत मारहाण केली. याच मारहाणीत संबंधित प्रियकराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीचे नाव गौरी शंकर यादव असे आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 02:49 PM • 11 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

रवीने महिलेला दररोज आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवल्या

point

आरोपी गौरी शंकरला पोलिसांनी घेतलं ताब्यात 

Crime News : दिल्लीतील गोकुळपुरी येथे एका 42 वर्षीय पुरुषाने आपल्या पत्नीच्या मित्रावर अवैध प्रेमसंबंधाचा संशय व्यक्त करत मारहाण केली. याच मारहाणीत संबंधित प्रियकराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीचे नाव गौरी शंकर यादव असे आहे. तसेच मृत व्यक्तीचे नाव रवी कुमार (वय 28) असे आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : साताऱ्यात भाजपला 'चेकमेट'; जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र येण्याचे संकेत!

आरोपी गौरी शकंर यादव हे उत्तर प्रदेशातील बलिया येथील रहिवासी आहे. पोलिसांनी या घटनेचा घटनाक्रम सांगितला. रवी हा तिचा अगदी जवळचा मित्र होता, त्याचदरम्यान गौरी शंकर यादव वाईट प्रसंगाचा सामना करत होता. जवळजवळ 10 महिन्यांपूर्वी आरोपी गौरी शंकर यादवची प्रकृती स्थिर बिघडल्याने त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 

रवीने महिलेला दररोज आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवल्या

त्याचदरम्यान रवीने महिलेला दररोज आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवण्याचे काम केले. एवढंच नाहीतर महिलेनं आपल्या मुलांच्या पोटापाण्यासाठी गोकुलपुरी येथे एक फुड स्टॉल सुरु केला होता. जवळजवळ एक महिन्यापूर्वी, जेव्हा तिला घराच्या संकटाचा सामना करावा लागला, तेव्हा रवीने तिला एक खोली भाड्याने देण्यास मदत केली आणि त्या ठिकाणी ती आपल्या मुलीसोबत तिथेच राहू लागली होती. 

7 फेब्रुवारी रोजी गौरी शंकर यादव सुरतहून दिल्लीला परतले तेव्हा घटनेला एक वेगळं वळण प्राप्त झालं. घरात रवीची उपस्थिती अस्वस्थ करु लागली, तो त्याच्या पत्नीशी रवीच्या नातेसंबंधावरून वाद घालू लागला होता. या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. 

आरोपी गौरी शंकरला पोलिसांनी घेतलं ताब्यात 

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना एक तुटलेली लाकडी काठी रक्तात माखलेली आढळून आली. रवीला ताबडतोब जीटीबी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी आरोपी गौरी शंकर यादवला ताब्यात घेतले आणि कठोर चौकशी सुरु केली. 

हे ही वाचा : मुंबई : रितू तावडे अस्सल मराठी चेहरा, फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा; रोहित पवारांच्या दाव्याबाबत काय म्हणाले?

यानंतर आरोपीने आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला होता. त्याने सांगितलं की, रागाच्याभरात त्याने रवीवर हल्ला केला होता. पोलिसांनी सध्या आरोपीला तुरुंगात टाकले. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत. 

    follow whatsapp