6 वर्षांच्या चिमुरडीची काय चूक? चालत्या ट्रेनमध्ये बापाने चिरला गळा; सहप्रवासी फक्त बघत राहिले

एका नराधम बापाने आपल्या सहा वर्षांच्या लेकीचा चालत्या ट्रेनमध्ये गळा चिरला. यावेळी उपस्थित असणारे प्रवासी फक्त बघत राहिले. यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून नराधम बापाला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी केली जात आहे.

Crime News

Crime News

मुंबई तक

• 03:51 PM • 05 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

6 वर्षांच्या चिमुरडीची काय चूक?

point

चालत्या ट्रेनमध्ये बापाने चिरला गळा

point

सहप्रवासी फक्त बघत राहिले

Crime News : माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम पित्याने चालत्या ट्रेनमध्ये आपल्या अवघ्या सहा वर्षांच्या चिमुरडीचा गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली. या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, रेल्वे पोलिसांनी आरोपी पित्याला रेल्वे स्थानकावर बेड्या ठोकल्या आहेत. आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

प्रवाशांच्या देखतच कापला गळा

डेकरगाव-मुरकोंगसेलेक एक्स्प्रेसमध्ये हा रक्तरंजित थरार घडला. आरोपी सुनील मुर्मू आपली मुलगी सुमीसोबत ट्रेनमधून प्रवास करत होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्ये बसल्यापासूनच सुनील गोंधळ घालत होता, त्यामुळे अनेक प्रवासी घाबरून दुसऱ्या डब्यात गेले. दरम्यान, अचानक त्याने मुलीला मारहाण करायला सुरुवात केली आणि रागाच्या भरात पिशवीतून चाकू काढून प्रवाशांच्या देखत मुलीचा गळा कापला.

हे ही वाचा : पुणे : घट्ट पकड, नाहीतर राजाला दुसरी बायको आणावी लागेल; निवृत्त सैनिकाच्या नातेवाईकांचा हवेत गोळीबार VIDEO

रेल्वे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

मुलीचा हृदयद्रावक आक्रोश ऐकून जेव्हा प्रवासी घटनास्थळी धावले, तेव्हा तेथील भयावह दृश्य पाहून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. प्रवाशांनी तातडीने रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. ट्रेन सिलोनिबारी स्थानकावर पोहोचताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आणि मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी पाठवला. या घटनेमुळे ट्रेनला काही काळ स्थानकावर थांबवून ठेवावे लागले होते.

हे ही वाचा : रील करण्याच्या बहाण्याने गर्लफ्रेंडचे दोन्ही हात मागे बांधले, अन् थंड डोक्याने थेट गळा चिरुन टाकला, नेमकं कारण काय?

हत्येचे कारण काय?

आरोपीच्या भावानेच त्याच्याविरोधात तक्रार दिली. या दिलेल्या तक्रारीवरून जीआरपीने 'भारतीय न्याय संहिता' कलम 103 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला लखीमपुर येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र, पोटच्या गोळ्याची इतक्या क्रूरपणे हत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.