“घरजावई हो नाहीतर...” होणाऱ्या जावयाने दिला नकार अन् सासरच्या मंडळींनी थेट...

एका तरुणाला त्याच्या सासरच्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत त्याचं डोकं देखील फुटल्याचं सांगितलं जात आहे.

होणाऱ्या जावयाने दिला नकार अन् सासरच्या मंडळींनी थेट...

होणाऱ्या जावयाने दिला नकार अन् सासरच्या मंडळींनी थेट...(फोटो सौजन्य: Grok AI)

मुंबई तक

• 03:43 PM • 14 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

घरजावई होण्याचा सासरच्या लोकांचा हट्ट...

point

होणाऱ्या जावयाने दिला नकार अन् सासरच्या मंडळींनी थेट...

Crime News: उत्तर प्रदेशातील बरेली येथे एका तरुणाला त्याच्या सासरच्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. शाहजहांपूर येथील रहिवासी असलेला पीडित तरुण हा कामानिमित्त बरेलीला आला होता. त्यानंतर त्याच्या सासरच्या मंडळींनी त्याला काठ्या आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचं डोकं देखील फुटल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर संबंधित तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केला. पोलित तक्रार करताना तो म्हणाला की, “माझ्या सासरच्या मंडळींनी मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. मला घरजावई बनून रहायचं नाही. त्याऐवजी मला माझ्या दोन्ही भावांसोबत राहायचं आहे. पण, माझ्या सासरची मंडळी घरजावई बनून रहावं, असा हट्ट करत आहेत.”

हे वाचलं का?

घरजावई होण्याचा सासरच्या लोकांचा हट्ट 

पीडित तरुणाच्या तक्रारीच्या आधारे बारादरी पोलिसांनी तक्रार नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शाहजहांपूरमधील कोतवाली मोहल्ला हयातपुरा येथील रहिवासी फैजानने बारादरी पोलिसांना त्याच्या तक्रारीत सांगितलं की, “मी हल्द्वानीमध्ये माझ्या भावांसोबत मजूर म्हणून काम करतो. माझं लग्न परिसरातील मोहम्मद बल्लू यांच्या मुलीशी ठरलं होतं. लग्नानंतर माझ्या सासरचे लोक मला शाहजहांपूर येथील त्यांच्याच घरी राहण्यासाठी दबाव आणत होते. मी माझ्या भावांना सोडणार नसून मला हल्द्वानीमध्येच राहायचं असल्याचं त्यांना सांगितलं.”

हे ही वाचा: पत्नी आणि मुलासमोर थेट मुंडकच कापलं अन् डस्टबिनमध्ये... अमेरिकेत ‘त्या’ भारतीयासोबत काय घडलं?

होणाऱ्या जावयावर जीवघेणा हल्ला  

पीडित तरुणाने सांगितलं की “10 सप्टेंबर रोजी मी माझा भाऊ असीमसोबत शाहजहांपूरहून बरेलीला आलो. दुपारी 2 वाजताच्या सुमारास मी लघवी करण्यासाठी सॅटेलाइट बस स्टँडजवळील रस्त्यावर गेलो. तेव्हा मोहम्मद बल्लू, मोहम्मद अयान आणि तिथल्या तीन अज्ञात तरुणांनी माझ्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात मी गंभीर जखमी झालो. मी त्यांच्याकडे माझ्या जीवाची याचना करत राहिलो. पण ते मला काठ्यांनी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत होते. माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून माझा भाऊ घटनास्थळी आला. हल्लेखोर मला शिवीगाळ करत आणि जीवे मारण्याची धमकी देत ​​तिथून पळून गेले.”

हे ही वाचा: शाळेतील मुख्याध्यापकावरच जडलं प्रेम, बनावट सोशल मीडिया अकाउंट... अचानक दुसऱ्या शिक्षिकेची एन्ट्री अन्..

फैजान म्हणाला की “मी माझ्या भावांशिवाय कोणाकडेही जाण्यास नकार दिला, ही गोष्ट माझ्या सासरच्यांना आवडली नाही आणि त्यांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. जर वेळीच कारवाई केली नाही तर माझ्या जीवाला मोठा धोका होऊ शकतो.” बारादरी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली असून पोलिसांनी तक्रार नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

    follow whatsapp