Crime News: अमेरिकेतील डलास येथे एका भारतीयासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. येथे वॉशिंग मशीनवरून झालेल्या किरकोळ वादाने इतकं भयानक वळण घेतलं की आरोपीने एका क्षणात त्या माणसाचा शिरच्छेद केला, तेही त्याच्या पत्नी आणि मुलासमोर. इतकंच नव्हे तर आरोपीने कापलेलं डोकं लाथ मारून जमिनीवर लोळवलं आणि नंतर ते उचलून कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलं. बुधवारी (10 सप्टेंबर) भारतीय नागरिक चंद्रा नागमल्लैया यांची त्यांच्या पत्नी आणि मुलासमोर एका मोटलमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना डलासमधील डाउनटाउन सूट्स मोटलमध्ये घडली. येथे नागमल्लैया आणि आरोपी योर्डानिस कोबोस-मार्टिनेझ कर्मचारी होते.
ADVERTISEMENT
तुटलेल्या वॉशिंग मशीनवरून वाद
तुटलेल्या वॉशिंग मशीनवरून दोघांमध्ये वाद झाला. नागमल्लैय्या याने आरोपी आणि त्याच्या महिला सहकाऱ्याला तुटलेल्या मशीनचा वापर न करण्याचा सल्ला दिला होता. यामुळे आरोपी कोबोस-मार्टिनेझ संतापला. नागमल्लैया याने महिलेशी थेट बोलण्याऐवजी आरोपीला ती जे बोलत होती त्याचं भाषांतर करण्यास सांगितलं होतं.
डोकं धडापासून वेगळं केलं
त्यानंतर आरोपी कोबोस-मार्टिनेझ रागाच्या भरात खोलीतून बाहेर आला आणि त्याच्याकडे असलेलं धारदार शस्त्र बाहेर काढलं. त्यावेळी नागमल्लैयाने आपला जीव वाचवण्यासाठी ओरडत पार्किंगच्या दिशेने धावण्यास सुरूवात केली. पण आरोपीने त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडून त्याच्यावर वारंवार हल्ला केला. आरोपीने पीडित तरुणाचं डोकं धडापासून वेगळं केलं. मग त्याने कापलेल्या डोक्याला निदर्यपणे फुटबॉलसारखं लाथ मारून गुंडाळलं आणि आणि ते डोकं कचऱ्याच्या डब्यात फेकलं.
हे ही वाचा: व्हिसा एजंटला डिनरला बोलवून केलं अपहरण! निर्दयीपणे केली मारहाण अन् अश्लील व्हिडीओ सुद्धा...
दरम्यान, नागमल्लैय्याची पत्नी आणि मुलगा घटनास्थळी उपस्थित होते. घटनेचा आवाज ऐकताच ते बाहेर पळाले, परंतु आरोपींनी त्यांना बाजूला ढकललं आणि नागमल्लैय्या यांच्यावर हल्ला सुरूच ठेवला. पत्नीच्या ओरडण्याचा आवाज परिसरात ऐकू येत असताना सुद्धा मदतीसाठी कोणीही पुढं आलं नाही. पार्किंग क्षेत्रात हा रक्तरंजित खेळ सुरू होता.
हे ही वाचा: शाळेतील मुख्याध्यापकावरच जडलं प्रेम, बनावट सोशल मीडिया अकाउंट... अचानक दुसऱ्या शिक्षिकेची एन्ट्री अन्..
हल्ल्यानंतर, आरोपी रक्ताने माखलेलं शस्त्र घेऊन पळून गेला. डलास अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी योर्डानिस कोबोस-मार्टिनेझला अटक केली. आरोपी हा क्यूबन नागरिक असल्याचं तपासादरम्यान आढळलं. त्याला यापूर्वीही अटक करण्यात आली होती, परंतु माजी अमेरिकन प्रशासनाने त्याला सोडून दिलं होतं. पण आता त्याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT
