विधवा महिलेसोबत 4 वर्ष केले शारीरिक संबंध..प्रेग्नंट झाल्यावर दुसऱ्या तरुणीसोबत केलं लग्न, बलात्कार प्रकरणात आरोपी गजाआड!

Today Shocking Viral News : छत्तीसगढच्या जशपूर जिल्ह्यात एका तरुणाने विधवा महिलेला लग्नाचं प्रॉमिस करून तिच्यासोबत चार वर्ष संबंध केले. त्यानंतर लग्नाला नकार दिल्यानं धक्कादायक घटना घडली.

(छायाचित्र: प्रतिनिधीक)

Today Shocking News

मुंबई तक

• 04:22 PM • 12 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आरोपीनं महिलेच्या घरात घुसून तिच्यावर केला अत्याचार 

point

पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

point

त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना

Today Shocking Viral News : छत्तीसगढच्या जशपूर जिल्ह्यात एका तरुणाने विधवा महिलेला लग्नाचं प्रॉमिस करून तिच्यासोबत चार वर्ष संबंध केले. त्यानंतर लग्नाला नकार दिल्यानं धक्कादायक घटना घडली. आरोपी तरुणाने महिलेसोबत अत्याचार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. जेव्हा पीडित महिला प्रेग्नंट झाली, तेव्हा तिला सोडून तरुणाने दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केलं. पीडित महिलेनं याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करत आरोपीवर अटकेची कारवाई केली आहे. 

हे वाचलं का?

आरोपीनं महिलेच्या घरात घुसून तिच्यावर केला अत्याचार 

किशुन असं आरोपीचं नाव आहे. पीडित महिलेला तीन मुलं आहे. ही संपूर्ण घटना जशपूर जिल्ह्यातील बगीचा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. पोलिसांनी गुरुवारी म्हटलं की, पीडितेच्या पतीच्या मृत्यूच्या सहा महिन्यानंतर आरोपीने रात्री तिच्या घरात घुसून लग्न आणि मुलांचं पालन पोषण करण्याचा शब्द दिला. त्यानंतर आरोपीने महिलेसोबत अत्याचार केला. त्यानंतर आरोपी महिलेली खोटी वचने देत राहिला.

हे ही वाचा >>  उपसरपंचाला कसा लागला बाईचा नाद? महागडे गिफ्ट पाहून पूजा व्हायची खुश..खतरनाक लव्ह स्टोरीचा 'असा' झाला THE END

मे 2025 मध्ये जेव्हा आरोपीने दुसऱ्या महिलेसोबत लग्न केलं आणि पीडितेला नकार दिला, तेव्हा पीडित महिलेनं बगीचा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तातडीनं कारवाई करत आरोपी किशुनला अटक केली. पोलीस चौकशीत आरोपीने गुन्हा कबूल केला. आरोपीला आयपीसीच्या कलम 366 (अपहरण) आणि 376 (2) (एन) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करून जेलमध्ये पाठवण्यात आलं. 

त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना 

छत्तीसगढच्या कोरबा जिल्ह्यात तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्याने संतापाची लाट पसरली होती. प्रियकराने त्याच्या प्रेयसीवर अत्याचार करून तिच्यावर धारदार शस्त्राने 52 वार करत तिचा खून केला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपी प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रेयसीचा दुसऱ्या तरुणासोबत अफेअर असल्याच्या संशयावरून आरोपीने हे धक्कादायक कृत्य केलं. ही घटना सीएसईबी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोरबा जिल्ह्यात घडली होती. 'हा गंभीर गुन्हा आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे', असं न्यायालयाने म्हटलं होतं. 

हे ही वाचा >> पूजा गायकवाड नर्तिका तुरुंगात, तरीही फॉलोअर्समध्ये झाली तब्बल 'एवढी' वाढ, लाईक्सचा पडतोय पाऊस

    follow whatsapp