Crime News: एक महिला बँक अधिकारी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेल्यानंतर तिथे तिच्यावर त्या मैत्रिणीच्या भावांनी बलात्कार केल्याची बातमी समोर आली आहे. दोन्ही तरुणांनी मिळून पीडितेवर सामूहिक बलात्कार केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेत पीडितेची मैत्रीण मुख्य आरोपी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंबंधी पीडितेच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आता पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
काय आहे नेमकी घटना?
कानपुरच्या सीमामऊ परिसरात राहणाऱ्या एका महिलेने आपली मुलगी काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. पीडिता बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत असून ती तिच्या नीलम नावाच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती, असं तक्रारदार महिलेने सांगितलं. तिथे नीलमचा भाऊ त्रिलोक शर्मा आणि त्याचा मित्र वैभव यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी तरुण हे स्वत: क्राइम ब्रांच इन्स्पेक्टर असल्याचा दावा करत होते.
हे ही वाचा: 2 वर्षांची मुलगी आईच्या अनैतिक संबंधाच्या आड... प्रियकरासोबत मिळून केली निर्घृणपणे हत्या अन्...
तसेच, प्रकरणातील आरोपींनी घटनेचा व्हिडिओ सुद्धा बनवला आणि तो व्हायरल करण्याची धमकी दिली. ते तीन महिने तिचे लैंगिक शोषण करत असल्याची माहिती समोर आली. पीडितेने लग्न केल्यास तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील आरोपींनी दिली. त्याने पीडितेच्या होणाऱ्या जावयाला सुद्धा घरी बोलावून हा व्हिडिओ दाखवला आणि नंतर तो त्याच्या काही मित्रांमध्येही व्हायरल केला. पीडितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, आता आरोपीचे मित्र तिच्या मुलीला वाटेत रोखतात आणि व्हिडिओ दाखवून तिचा अपमान करतात.
हे ही वाचा: "पप्पा दारू पिऊन मला खोलीत नेतात आणि माझ्यासोबत..." पीडितेने शिक्षिकेला वडिलांच्या 'त्या' कृत्याबद्दल सगळंच सांगितलं...
महिलेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी त्रिलोक शर्मा, त्याचा मित्र वैभव आणि त्रिलोकची बहीण नीलम यांच्याविरुद्ध सामूहिक बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे. तसेच, कानपुर क्राइम ब्रांचमध्ये वैभव नावाचा कोणाताही इंन्स्पेक्टर तैनात नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस महिलेची वैद्यकीय तपासणी करण्याची आणि कलम 164 अंतर्गत तिचा जबाब नोंदवण्याच्या तयारीत आहेत.
ADVERTISEMENT
