Rape Crime News : छत्तीसगढच्या कोरबा जिल्ह्यात तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. एका प्रियकराने त्याच्या प्रेयसीवर अत्याचार करून तिच्यावर धारदार शस्त्राने 52 वार करत तिचा खून केला. या घटनेमुळं सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने आरोपी प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रेयसीचा दुसऱ्या तरुणासोबत अफेअर असल्याच्या संशयावरून आरोपीने हे धक्कादायक कृत्य केलं. ही घटना सीएसईबी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोरबा जिल्ह्यात घडली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने म्हटलं की, हा गंभीर गुन्हा आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 24 डिसेंबर 2022 रोजी घडली होती. आरोपी सहबान खान गुजरातहून विमान प्रवास करत छत्तीसगढला पोहोचला होता आणि कोरबाच्या एका हॉटेलमध्ये थांबला होता. त्यानंतर त्याने प्रेयसीला फोन केला आणि तिला त्याच्या घरी बोलावलं. त्याचदरम्यान, त्याने तरुणीवर बलात्कार केला आणि 52 वार करून तिची हत्या केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळाहून फरार झाला.
न्यायालयाने आरोपीला सुनावरी जन्मठेपेची शिक्षा
पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी या घटनेचा तपास करत आरोपी सहबान खानला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. गुरुवारी याप्रकरणी सुनावणी पार पडली. जिल्हा न्यायालयाचे विशेष न्यायाधीश जयदीप गर्ग ( SC/ST अत्याचार निवारण अधिनियम) यांच्या खंडपीठाने आरोपी भडिया बगीचा, सहबान खानला आयपीसीच्या कलम 376,302, एससी/एसटी कलम 3(2) (W)अंतर्गत आरोपीला दोषी ठरवलं. न्यायालयाने आरोपीला आजीवान जन्मठेपेची शिक्षा सुनावत 75 हजारांचा दंड ठोठावला.
हे ही वाचा >> पूजा गायकवाड नर्तिका तुरुंगात, तरीही फॉलोअर्समध्ये झाली तब्बल 'एवढी' वाढ, लाईक्सचा पडतोय पाऊस
त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना
उत्तर प्रदेशात एका तरुणाने तिच्या प्रेयसीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना समोर आली होती. संबंधित तरुणाने त्याच्या मित्रासोबत मिळून प्रेयसीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी तरुणाने शेतात जाऊन आपल्या मित्रासोबत पीडितेवर लैंगिक अत्याचार केला होता. इतकेच नव्हे तर पीडितेसोबत बळजबरीने संबंध प्रस्थापित केल्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास भाग पाडण्यात आलं. त्यानंतर, उपचारादरम्यान, पीडितेचा रुग्णालयातच मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं.
हे ही वाचा >> 'माझी भावकीत अब्रू जाईल...' माजी उपसरपंचाने पूजा गायकवाडला सांगितली 'ती' गोष्टी पण तरीही पूजाने...
ADVERTISEMENT
