6 वर्षाच्या मुलीला 5 रुपयांचे आमिष दाखवून दोघांनी निर्जनस्थळावरील खोलीत नेलं, नंतर लैंगिक शोषण करत पीडितेला रक्तस्त्राव...

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना आता समोर आली आहे. दोन अल्पवीन मुलांनी 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला 5 रुपयाचे आमिष दाखवून वासनेचं बळी बनवलं आहे.

crime news

crime news

मुंबई तक

11 Sep 2025 (अपडेटेड: 11 Sep 2025, 11:21 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना

point

6 वर्षांच्या मुलीला पाच रुपयांचे आमिष दाखवले

point

निर्जनस्थळावरील घरात नेमकं काय घडलं?

Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना आता समोर आली आहे. दोन अल्पवीन मुलांनी 6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला 5 रुपयाचे आमिष दाखवून वासनेचं बळी बनवलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे लैंगिक शोषण करणाऱ्यांपैकी एका मुलाचे वय वर्षे हे 10 आहे. तर दुसऱ्या तरुणाचे वय वर्षे हे 13 असल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना कानपूरातील जाजमौ येथे बुधवारी घडली.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मूल होत नाही म्हणून महिला मांत्रिकाकडे गेली, नंतर पेढा देत अंगारही लावला, तीन लाखांना गंडा घालत... नऊ महिने सुरू होता खेळ

भयंकर प्रकरण 

दोन्ही अल्पवयीन मुलांनी 6 वर्षांच्या निष्पाप मुलीला पाच रुपयांचे आमिष दाखवून निर्जनस्थळी असलेल्या घरात नेले आणि लैंगिक केले. या मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनंतर मुलगी घरी परतली असता, तिने घडलेला सर्व प्रकार कुटुंबाला सांगितला. संबंधित घटनेची पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. मुलीला उपचारासाठी काशीराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

रुग्णालयात मुलीला रक्तस्त्राव अन्...

संबंधित प्रकरणात असा आरोप आहे की, पोलीस मुलीला घेऊन जेव्हा काशीराम रुग्णालयात पोहोचले होते तेव्हा डॉक्टरांनी निष्काळजीपणा दाखवला होता. पीडितेचा रक्तस्त्राव होत असूनही महिला डॉक्टरने पीडितेवर उपचार करण्यास सुरुवात केली नव्हती. पोलिसांनी संबंधित महिला डॉक्टरशी वाद घातला. त्यानंतर डॉक्टर म्हणाले की कागदपत्रे आल्यानंतरच पुढील उपचार सुरू करण्यात येतील, असे सांगितलं.

हे ही वाचा : Maharashtra Weather: कोकणात पावसाचा जोर, पाहा कसं असेल संपूर्ण राज्यातील वातावरण

दरम्यान, कानपूरच्या एसीपी आकांक्षा पांडे यांनी सांगितलं की, मुलीच्या वडिलांच्या मागणीवरून तक्रार दाखल करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही.

    follow whatsapp