मुलगाच हवा म्हणून आईचं निर्दयी कृत्य! 2 महिन्यांच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवलं अन्...

आपल्याला मुलगाच व्हावा, या इच्छेतून एका महिलेने तिच्या दोन महिन्यांच्या निष्पाप मुलीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

2 महिन्यांच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवलं अन्...

2 महिन्यांच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवलं अन्...(फोटो सौजन्य: Grok AI)

मुंबई तक

• 12:02 PM • 12 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुलगाच हवा म्हणून आईचं निर्दयी कृत्य!

point

2 महिन्यांच्या मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून केली हत्या...

Murder Case: गुजरातच्या राजकोटच्या जिल्ह्यातून मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. आपल्याला मुलगाच व्हावा, या इच्छेतून एका महिलेने तिच्या दोन महिन्यांच्या निष्पाप मुलीची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, ही घटना कोटडा सांगाणी पोलीस स्टेशन परिसरात घडली. प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव मुस्कान कयानी असून तिच्या पतीचं नाव साजिद असल्याची माहिती आहे. दोघांचं 6 वर्षांपूर्वी लग्न झालं आणि त्यांना नुरीना आणि आयशा नावाच्या दोन मुली आहेत. घटनेच्या दिवशी साजिद सकाळी 8 वाजता त्याच्या कामावर गेला. त्या दिवशी संध्याकाळी मुस्कानने तिच्या पतीला फोन केला आणि आयशा घरातून गायब असल्याचं सांगितलं. 

पाण्याच्या टाकीत मुलीचा मृतदेह 

साजिदने लगेच त्याच्या आई-वडिलांना सुद्धा याबद्दल सांगितलं. त्यानंतर, घरी पोहोचल्यानंतर स्वयंपाकघरातील पाण्याच्या टाकीत आयशाचा मृतदेह आढळला. तिला उपचारांसाठी लगेच रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

हे ही वाचा: एका नवरीचे 25 नवरे! प्रत्येकासोबतच करायची... रात्री नवऱ्याला सांगायची 'ती' गोष्ट अन् सकाळी उठताच...

मुलगा होण्यासाठी मुलीची हत्या...

या घटनेनंतर मुस्कान काही दिवस साजिदसोबत राहिली. मात्र, काही दिवसांनंतर साजिदला आपल्या पत्नीवर संशय येत असल्यामुळे त्याने मुस्कानला तिच्या माहेरी पाठवलं. काही काळानंतर, मुस्कानचा भाऊ मोहसिन याने साजिदला सांगितलं की, पुढे मुलगा होण्यासाठी मुस्कानने आयशाला पाण्यास बुडवून मारून टाकलं असल्याचं तिने स्वतः कबूल केलं आहे. मोहसिनची पत्नी सायस्ता हिनेही इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवून साजिदला हीच माहिती दिली.

हे ही वाचा: 2 मुलांची आई पतीला सोडून प्रियकराकडेच राहायला गेली...पण बॉयफ्रेंडला सरकारी नोकरी लागली अन् सगळंच बिघडलं!

पतीवरच केला खोटा आरोप 

सुरूवातीला, साजिदने पोलिसात जाण्याचं टाळलं आणि पत्नीसोबत घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू केली. परंतु, मुस्कानने तिचा पती साजिदवर तिच्या मुलीच्या मृत्यूचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आणि तेव्हा साजिदने संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं. प्राथमिक तपासात पोलिसांना साजिदचे आरोप खरे आढळले आणि त्यांनी मुस्कानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 

    follow whatsapp