Crime News: एका दोन मुलांच्या आईने प्रियकरासाठी नवऱ्याला सोडल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिला तिचं घर सोडून प्रियकरासोबत राहू लागली आणि तेव्ही ती तिच्या दोन मुलांना सुद्धा सोबत घेऊन गेली. आपल्या प्रियकरावर विश्वास ठेवून त्या महिलेने पतीसोबत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज देखील दाखल केला होता. यादरम्यान, संबंधित तरुणाला म्हणजेच प्रियकराला केएसआरटीसी मध्ये नोकरी मिळाली आणि त्यानंतर, त्याचं त्याच्या प्रेयसीसोबत वागणंच बदललं.
ADVERTISEMENT
प्रकरणातील महिलेचं नाव नवीन असून तो हुबली जिल्ह्यात राहत असल्याची माहिती आहे. तो तीन वर्षांपूर्वी दावणगेरे येथे आला होता. गेल्या बुधवारी (10 सप्टेंबर) दुपारी दावणगेरे शहराच्या शामनूर रोडवर असलेल्या टँक पार्कमध्ये नवीन आणि त्या महिलेचं मोठं भांडण झालं. पीडितेने दावणगेरे बरंगे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि न्यायाची मागणी केली. संबंधित महिला हरपनहल्ली येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
प्रियकरासाठी पतीला सोडलं अन्...
तीन वर्षांपूर्वी त्या महिलेची नवीनशी ओळख झाली होती. भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या महिलेला दोन मुलं असून ती तिच्या पतीला सोडून मुलांसोबत नवीनकडे आली. त्यानंतर, तिने तिच्या पतीसोबत घटस्फोट घेण्यासाठी अर्ज देखील दाखल केला. काही काळानंतर, नवीनला केएसआरटीसी मध्ये नोकरी मिळाली आणि नोकरी मिळताच त्याचं वागणं बदललं. त्यानंतर, दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले.
हे ही वाचा: एका नवरीचे 25 नवरे! प्रत्येकासोबतच करायची... रात्री नवऱ्याला सांगायची 'ती' गोष्ट अन् सकाळी उठताच...
पोलीस स्टेशनमध्ये केली तक्रार दाखल
बुधवारी, शामनूर रोडवरील टँक पार्कमध्ये दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर पार्कमध्ये लोकांची गर्दी जमली. त्यावेळी रागाच्या भरात नवीनने महिलेवर हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, माहिती मिळताच दावणगेरे बरंगे पोलीस घटनास्थली पोहोचले आणि दोघांनाही पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले. त्यानंतर, संबंधित महिलेची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीदरम्यान, महिलेने नवीनवर आपले दागिने आणि पैसे उकळल्याचा आरोप लावत तिच्याविरोधात तक्रार केली.
हे ही वाचा: 'माझी भावकीत अब्रू जाईल...' माजी उपसरपंचाने पूजा गायकवाडला सांगितली 'ती' गोष्टी पण तरीही पूजाने...
यासोबतच, नवीनने आपल्याला धोका दिल्याचा आरोप पीडितेने केला. आता पोलीस नवीनची देखील चौकशी करणार असून प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
