'माझी भावकीत अब्रू जाईल...' माजी उपसरपंचाने पूजा गायकवाडला सांगितली 'ती' गोष्टी पण तरीही पूजाने...
नर्तकीच्या तगाद्याने त्रस्त झालेल्या माजी उपसरपंचाने पूजा गायकवाड हिला बऱ्याचदा विनवणी केली होती. याबाबत तक्रारीत अनेक धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत.
ADVERTISEMENT

गणेश जाधव, सोलापूर: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बरगे (वय 38) यांच्या आत्महत्येनंतर आता त्यांच्या मेव्हण्याने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. पारगाव कला केंद्रातील नर्तकी पूजा गायकवाड (वय 21) हिच्या सततच्या मालमत्ता व पैशांच्या तगाद्यामुळे गोविंद यांनी तिच्यासमोर ‘माझी भावकीत अब्रू जाईल’ अशी विनवणी केली होती. मात्र, पूजाने हा तगादा सोडला नाही आणि बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत संपर्क तोडला. असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मानसिक ताणामुळे गोविंद यांनी 9 सप्टेंबर रोजी वैरागजवळ सासुरे गावात पूजाच्या घरासमोरच चारचाकी गाडीत डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली असल्याचाही दावा तक्रारीत करण्यात आला आहे. वैराग पोलिसांनी पूजाला अटक करुन कोर्टात हजर करण्यात आलं. ज्यानंतर कोर्टाने तिला तीन दिवसांची कोठडी सुनावली असून, तिच्या कॉल रेकॉर्ड व व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.
हे ही वाचा>> माजी उपसरपंचाने पूजाला दाखवला बंगला अन् सगळा खेळ खल्लास! पूजाचा होता 'त्या' बंगल्यावर डोळा, तिच्या नादापायी...
तक्रारीतील मुख्य आरोप
गोविंद यांचे मेहुण्यांच्या फिर्यादीनुसार, गोविंद यांनी गेवराई येथे नुकताच अलिशान बंगला बांधला होता. हा बंगला त्यांचा मित्र चंद्रकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पूजाला दाखविला. बंगला आवडल्याने पूजाने त्यात दोन दिवस मुक्काम केला आणि ‘हा बंगला माझ्या नावावर करा’ असा तगादा लावला. गोविंद यांनी स्पष्टपणे सांगितले, ‘तुला दुसरे घर घेऊन देतो, पण हा बंगला तुझ्या नावावर करू शकत नाही. ते माझ्या पत्नी व वडिलांना माहित झाले तर भावकीत माझी अब्रू जाईल.’ तरीही पूजाने तगादा सोडला नाही.
यानंतर 15 दिवसांपूर्वी पूजाने गोविंद यांना फोन करून म्हटले होते की, ‘माझा वाढदिवस 15 सप्टेंबरला आहे. त्यापूर्वी गेवराईचा बंगला माझ्या नावावर करा किंवा सासुरे गावात माझ्या भावाच्या नावावर 5 एकर शेती घेऊन द्या. नाहीतर बोलणार नाही.’ नकार मिळाल्यावर तिने धमकी दिली, ‘मी तुमच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करीन, तुमची बदनामी करीन.’ यानंतर पूजाने गोविंद यांच्याशी बोलणे बंद केले. या तगाद्याने गोविंद यांच्यावर वारंवार मानसिक त्रास होत होता.










