एका नवरीचे 25 नवरे! प्रत्येकासोबतच करायची... रात्री नवऱ्याला सांगायची 'ती' गोष्ट अन् सकाळी उठताच...

एका अशा महिलेबद्दल जाणून घ्या, जिने 25 पुरुषांशी लग्न केलं आहे. पण तिने हे कसं केलं आणि इतके पुरुष तिच्याशी लग्न का केलं? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

एका नवरीचे 25 नवरे! प्रत्येकासोबतच करायची...

एका नवरीचे 25 नवरे! प्रत्येकासोबतच करायची...

मुंबई तक

• 10:25 AM • 12 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

एका नवरीने केलं 25 पुरुषांशी लग्न

point

रात्री नवऱ्याला सांगायची 'ती' गोष्ट अन् सकाळी उठताच...

Crime News: एका महिलेने दोन लग्न करणं, ही सामान्य बाब आहे, पण एका नवरीचे तब्बल 25 नवरे असल्याचं तुम्ही कधी ऐकलं सुद्धा नसेल. एका अशा महिलेबद्दल जाणून घ्या, जिने 25 पुरुषांशी लग्न केलं आहे. पण तिने हे कसं केलं आणि इतके पुरुष तिच्याशी लग्न का केलं? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हे वाचलं का?

खरंतर, भोपालच्या शिवनगरमध्ये राहणाऱ्या एका महिलेनं तब्बल 25 पुरुषांशी लग्न केल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिलेचं नाव अनुराधा असून ती 23 वर्षांची असल्याची माहिती आहे. ही महिला पुरुषांसोबत लग्न करायची आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी घरातील रोख रक्कम आणि दागिने तसेच मौल्यवान वस्तू घेऊन फरार व्हायची. 

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरी गायब

अनुराधाने बऱ्याच राज्यांमधील पुरुषांशी खोटं लग्न करून त्यांची फसवणूक केल्याचं सांगितलं जात आहे. ती लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच घरातील पैसे, दागिने आणि मोबाईल सारख्या मौल्यवान वस्तू घेऊन घरातून पळून जायची. आरोपी महिलेच्या विष्णू गुप्ता नावाच्या एका नवऱ्याने आपल्या पत्नीविरुद्ध FIR दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. तक्रारदार पतीने सांगितलं की सुनीता आणि पप्पू मीना नावाच्या दोन व्यक्तींनी त्याला एक आदर्श बायको मिळवून देण्याचं वचन दिलं होतं.  त्यानंतर विष्णूने अनुराधाशी लग्न केलं.

हे ही वाचा: 'माझी भावकीत अब्रू जाईल...' माजी उपसरपंचाने पूजा गायकवाडला सांगितली 'ती' गोष्टी पण तरीही पूजाने...

लग्नाच्या 7 दिवसानंतरच नवरी फरार

अनुराधासोबत लग्न करण्यासाठी विष्णूने 2 लाख रुपये दिले आणि त्यानंतर, सवाई मधोपूर येथे त्यांचं लग्न झालं. मात्र, लग्न झाल्याच्या 7 दिवसांनंतर अनुराधा घरातील पैसे, दागिने आणि मोबाईल घेऊन फरार झाली. 

हे ही वाचा: Personal Finance: कर्ज घेणाऱ्यांना मोठा दिलासा, 'या' बँकेने MCLR दर केले कमी आता EMI होणार कमी!

अनुराधाच्या टीममधील लोक सुरुवातीला लग्नासाठी मुलगी शोधणाऱ्या लोकांना टार्गेट करायचे. अशा लोकांना शोधल्यानंतर त्यांना अनुराधाचा फोटो दाखवला जायचा. त्यानंतर लग्नाच्या नावाखाली दोन ते पाच लाख रुपये वसूल केले जात होते. त्यानंतर दोघांचं लग्न लावून दिलं जात होतं. लग्नानंतर चोरटी नवरी नवऱ्याचा घरातील सामान आणि पैसे घेऊन पळून जायची. मात्र, आता ती महिला पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे. 

​​​​​​​

    follow whatsapp