हाथरस: उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातून एक अतिशय लज्जास्पद घटना समोर आली आहे. येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नातेसंबंधांना लाजवेल अशीच ही घटना आहे. हाथरस जिल्ह्यातील 6 वर्षांच्या निष्पाप मुलीची हत्या करून तिचा मृतदेह पोत्यात बांधून विहिरीत फेकल्याचे प्रकरण पोलिसांनी उलगडल्याचा दावा केला आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार, अनैतिक संबंध लपवण्यासाठी निष्पाप मुलीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी 33 वर्षीय मुलीच्या आईला म्हणजेच पिंकी शर्मा हिला अटक केली आहे. त्याच वेळी, तिच्या 17 वर्षीय प्रियकराला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची देखील चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांच्या माहितीनुसार, 6 वर्षीय मुलगी उर्वी ही 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता तिच्या घरातून बेपत्ता झाली होती. दुपारी 1.30 वाजता तिचा मृतदेह एका विहिरीत पोत्यात बांधलेल्या अवस्थेत सापडला. यावेळी तिच्या गळ्यात कापड बांधलेले होते. शवविच्छेदन अहवालात तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा>> आईचे लेकीच्या बॉयफ्रेंडसोबत प्रेमसंबंध, पत्नी नवऱ्याचे दागिने चोरून बॉयफ्रेंडला द्यायची, नंतर मोठा प्लॅन रचत...
अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक कुमार सिंह यांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितलेलं की, मुलीने पिंकी शर्मा आणि तिच्या अल्पवयीन प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. मुलीने हे तिच्या वडिलांना सांगण्याची धमकी दिली होती, त्यानंतर दोघांनीही तिचा गळा दाबून खून केला.
अशी आली घटना उघडकीस!
अटक करण्यात आलेल्या पिंकीने पोलिसांना सांगितले की, तिचे गेल्या 3 महिन्यांपासून एका 17 वर्षीय मुलासोबत अनैतिक संबंध सुरू होते. घटनेच्या दिवशी तिचा नवरा आणि सासू घरी नसताना तिने अल्पवयीन मुलाला घरी बोलावले होते. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीने त्यांना आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. जेव्हा तिने तिच्या वडिलांना हे सांगण्याची धमकी दिली तेव्हा दोघांनी मिळून तिची हत्या केली. नंतर त्यांनी मृतदेह एका पोत्यात भरला आणि एका विहिरीत फेकून दिला. अटकेच्या वेळी महिलेच्या हातावर चावल्याच्या खुणा देखील होत्या ज्या कदाचित मुलीने जीव वाचविण्यासाठी केलेल्या संघर्षादरम्यान झाल्या असण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा>> लव्ह सेXX आणि धोका, लग्नाचं आमिष दाखवलं, प्रेग्नन्सी अन्...
शर्मा कुटुंबीयांवर आघात
आता या प्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक करून तिच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या संपूर्ण घटनेने शर्मा कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पिंकीचे एका अल्पवयीन मुलाशी अनैतिक शारीरिक संबंध होते याची तिच्या कुटुंबीयांना अजिबात माहिती नव्हती. त्यामुळे अनैतिक संबंध आणि 6 वर्षाच्या मुलीची हत्या या दोन्ही घटनेने शर्मा कुटुंब पूर्णपणे हादरून गेलं आहे.
ADVERTISEMENT
