Crime News: उत्तर प्रदेशातील हरदोईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नी सतत रील बनवत असल्यामुळे पतीने रागाच्या भरात आपल्या पत्नी आणि मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला करत त्यांची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून मुलगी गंभीररित्या जखमी झाली आहे. त्यावेळी तिला तातडीने लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं आणि तिची प्रकृती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
पत्नी सतत रील बनवायची...
ही घटना अतरौली परिसरातील सिकरी माजरा भिखपूर आयमा येथील असल्याची माहिती समोर आली आहे. येथे राहणारा रामसनेही नावाचा तरुण शेती करून स्वत:चं घर चालवत होता. 15 वर्षांपूर्वी बिहारची रहिवासी असलेल्या वेदना नावाच्या तरुणीसोबत रामसनेहीचं लग्न झालं होतं. दोघांना सुद्धा पाच मुलं आहेत. खरंतर, वेदना सतत व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट करत असायची. याच गोष्टीमुळे रामसनेहीला पत्नीचा खूप राग यायचा. बुधवारी रात्री पत्नी तिच्या पाच मुलांसोबत बेडवर झोपली होती. त्यावेळी पती आणि पत्नीमध्ये रील बनवण्यावरून मोठा वाद झाला.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबईला जाण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ वाचणार! 'या' टोल नाक्याचा प्रश्न मार्गी लागणार...
पत्नी आणि मुलीवर केला हल्ला
पत्नी झोपी गेल्यानंतर संधी साधून रामसनेहीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. बाजूला झोपलेल्या 13 वर्षांच्या मुलीने याचा विरोध केला असता वडिलांनी तिच्यावर सुद्धा हल्ला केला. त्यावेळी दोघी सुद्धा गंभीर पद्धतीने जखमी झाल्या. रात्री सुमारे 11 वाजता पोलिसांना या घटनेबद्दल माहिती देण्यात आली. यानंतर, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. घटनेत जखमी झालेल्या आई आणि मुलीला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी वेदनाला मृत घोषित केलं. मुलीची प्रकृती नाजूक असल्याने तिला ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आलं.
हे ही वाचा: अंगावरचे कपडे फाडून पत्नीला अर्धनग्न केलं, नंतर भर रस्त्यात... 'त्या' शिक्षिकेसोबत पतीने नेमकं काय केलं?
पोलिसांचा तपास
या प्रकरणाची माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की पतीने पत्नीला मारहाण करत तिची हत्या केली. तसेच, मुलीने विरोध केला असता आरोपीने तिच्यावर सुद्धा हल्ला केला. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी रामसनेहीला अटक करण्यात आली आहे. तसेच, पीडितेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
