मुंबईची खबर: आता मुंबईला जाण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ वाचणार! 'या' टोल नाक्याचा प्रश्न मार्गी लागणार...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिसर टोल नाक्याचा प्रश्न मार्गी लावला असल्याची बातमी समोर आली आहे. आता हा टोल नाका ऑक्टोबर महिन्यापूर्वी वर्सोवा ब्रिजजवळ शिफ्ट केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईला जाण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ वाचणार

'या' टोल नाक्याचा प्रश्न मार्गी लागणार...

मुंबईकरांसाठी दिलासाजनक बातमी
Mumbai News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहिसर टोल नाक्याचा प्रश्न मार्गी लावला असल्याची बातमी समोर आली आहे. आता हा टोल नाका ऑक्टोबर महिन्यापूर्वी वर्सोवा ब्रिजजवळ शिफ्ट केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. दहिसर टोल नाका दहिसर टोल नाका हटवण्यात येणार असल्यामुळे मुंबईला जाण्यासाठी सुमारे 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. या निर्णयामुळे मुंबईत प्रवेश करणाऱ्या वाहन चालकांना आणि मीरा-भाईंदरच्या जवळपास 15 लाखांहून अधिक स्थानिकांना अखेर मोठा दिलासा मिळणार आहे. या टोल नाक्यामुळे स्थानिक वर्षानुवर्षे वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येचा सामना करत आहेत. दहिसर टोल नाका आता शहराच्या हद्दीबाहेर हलवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
लाखो नागरिकांना होणार फायदा...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, हा नवीन टोल नाका दहिसरपासून सुमारे 2 किमी पुढे वर्सोवा पुलासमोरील नर्सरी परिसरात बांधण्यात येणार आहे आणि दिवाळीपूर्वीच तो कार्यान्वित करण्याचं ध्येय आहे. हा टोल नाका हटवण्यात येणार असल्यामुळे मीरा-भाईंदर आणि मुंबई दरम्यान दररोज जवळपास 2.5 ते 3 लाख वाहनांना फायदा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा: Govt Job: लाखोंच्या पगाराची नोकरी हवीये? मग एअरपोर्टवरील 'या' भरतीची संधी अजिबात सोडू नका...
प्रदूषणही कमी होईल
टोल नाक्यांवर 10 ते 15 मिनिटे वाट पाहावी लागते आणि ही प्रतिक्षा कधीकधी 30-45 मिनिटांपर्यंत सुद्धा पोहचत असल्याचं पाहायला मिळतं. अशा परिस्थितीत वाहतूक कोंडीमुळे दररोज हजारो लिटर इंधन वाया जातं. सरकारच्या या निर्णयामुळे आता वेळ तर वाचेलच पण त्यासोबत प्रदूषणही कमी होईल.
हे ही वाचा: दोघांचं लग्न ठरलं, पण होणाऱ्या पतीने लग्नाआधीच केली 'ती' मागणी! पत्नीने नकार दिला अन् नंतर जे काही घडलं ते...
मुंबईकरांसाठी टोल-मुक्त प्रवासाचं गिफ्ट
मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात हा टोल नाका असून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि तिथले नागरिक बऱ्याच काळापासून ते हलवण्याची मागणी करत होते. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मुद्दा सरकारसमोर उपस्थित केला. त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावून सर्व संबंधित विभाग आणि एजन्सीसोबत चर्चा केली. आता दहिसर टोल नाका पुढे हलवल्याने मीरा-भाईंदर आणि मुंबई दरम्यान प्रवास करणं सोपं होणार आहे. स्थानिक नागरिकांना दिवाळीपूर्वीच टोल-मुक्त प्रवासाचं हे गिफ्ट असल्याचं सांगितलं जात आहे.