अंगावरचे कपडे फाडून पत्नीला अर्धनग्न केलं, नंतर भर रस्त्यात... 'त्या' शिक्षिकेसोबत पतीने नेमकं काय केलं?
एका शिक्षिकेच्या पतीने आपल्या पत्नीचे कपडे फाडले आणि नंतर तिला भर रस्त्यात फिरवलं. इतकंच नव्हे तर, पतीने आपल्या पत्नीच्या भांगेत दुसऱ्याच पुरुषाला सिंदूर भरायला लावलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अंगावरचे कपडे फाडून पत्नीला अर्धनग्न केलं अन्...

'त्या' शिक्षिकेसोबत पतीने नेमकं काय केलं निर्दयी कृत्य!
Crime News: ओडिशाच्या पुरी येथे एका शिक्षिकेच्या पतीने आपल्या पत्नीचे कपडे फाडले आणि नंतर तिला भर रस्त्यात फिरवलं. इतकंच नव्हे तर, पतीने आपल्या पत्नीच्या भांगेत दुसऱ्याच पुरुषाला सिंदूर भरायला लावलं. पण, निर्दयी पतीने त्याच्या पत्नीसोबत असं का केलं? सविस्तर घटना जाणून घ्या.
संबंधित घटना ओडिशाच्या पुरी येथे घडल्याची माहिती समोर आली आहे. एक 37 वर्षीय शिक्षिका बऱ्याच काळापासून आपल्या पतीपासून वेगळी राहत होती. आरोपी पती जगतसिंगपुर जिल्ह्यातील एका इन्स्टिट्यूटमध्ये लेक्चरर आहे. पीडित महिला आपल्या 14 वर्षांच्या मुलासोबत पतीपासून वेगळी राहत होती. परंतु, आपल्या पत्नीचे दुसऱ्याच पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा पतीला संशय होता.
अंगावरील कपडे फाडून त्यांना अर्धनग्न केलं
मंगळवारी (9 सप्टेंबर) रात्री महिलेचा पती त्याच्या मित्रासोबत अचानक न सांगता पीडितेच्या घरात घुसला. त्यावेळी दोघांनी मिळून महिला आणि तिच्या घरात असलेल्या एका व्यक्तीवर हातोडीने वार केले. त्यानंतर, आरोपी पती एवढ्यावरच न थांबता त्याने दोघांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांना अर्धनग्न केलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबईला जाण्यासाठी अर्ध्या तासाचा वेळ वाचणार! 'या' टोल नाक्याचा प्रश्न मार्गी लागणार...
दुसऱ्याच पुरुषाने पत्नीच्या भांगेत सिंदूर...
यानंतर, पतीने पीडित महिलेचे केस धरून तिला ओढत बाहेर आणलं. वाटेतच पतीने महिलेला आणि तिच्यासोबत असलेल्या पुरूषाला एकमेकांना हार घालायला लावले. इतकेच नव्हे तर पतीने त्या पुरूषाला महिलेच्या मांगेत जबरदस्तीने सिंदूर भरायला लावलं आणि पत्नीला संपूर्ण परिसरात त्या अवस्थेत फिरवलं. लोकांनी पतीच्या या कृत्याचा व्हिडीओ बनवला. आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हे ही वाचा: Govt Job: लाखोंच्या पगाराची नोकरी हवीये? मग एअरपोर्टवरील 'या' भरतीची संधी अजिबात सोडू नका...
प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांच्या माहितीनुसार, पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध असल्याचा पतीला संशय होता. याच कारणामुळे पतीने पत्नीसोबत इतकं निर्दयी कृत्य केलं.