महिलेचे हात-पाय बांधले अन्... 13 व्या मजल्यावरील लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं? सीसीटीव्ही मध्ये झालं रेकॉर्ड!

एका महिलेची अज्ञात लोकांनी निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. इमारतीच्या 13 व्या मजल्यावर राहणाऱ्या पीडितेचे हात-पाय बांधून तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे.

13 व्या मजल्यावरील लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं? सीसीटीव्ही मध्ये झालं रेकॉर्ड!

13 व्या मजल्यावरील लिफ्टमध्ये नेमकं काय घडलं? सीसीटीव्ही मध्ये झालं रेकॉर्ड! (फोटो सौजन्य: Grok AI)

मुंबई तक

• 10:05 AM • 11 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेचे हात-पाय बांधले अन् तिच्यासोबत निर्घृण कृत्य

point

13 व्या मजल्यावरील लिफ्टमध्ये घडली घटना

Crime News: तेलंगणाच्या कुकटपल्ली परिसरात हत्येचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कुकटपल्ली येथील स्वान लेक अपार्टमेंटमध्ये रेणु अग्रवाल (50) नावाच्या महिलेची अज्ञात लोकांनी निर्घृणपणे हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. इमारतीच्या 13 व्या मजल्यावर राहणाऱ्या पीडितेचे हात-पाय बांधून तिची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात लिफ्टमध्ये दोन लोक संशयास्पदरित्या प्रवास करत असल्याचं रेकॉर्ड झालं आहे.

हे वाचलं का?

कशी झाली हत्या? 

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेचे हात-पाय बांधलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. पुराव्यांच्या आधारे, पीडित महिलेच्या डोक्यात प्रेशर कुकरचं झाकण मारून आणि धारदार चाकूने वार करून तिची हत्या करण्यात आली आहे. हत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलीस चोरीच्या अनुषंगाने देखील तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा: Nepal Violence: बापरे... ठाण्यातील 112 पर्यटक नेपाळमध्ये अडकले, नेमकी परिस्थिती काय?

आरोपी लिफ्टमध्ये संशयास्पदरित्या दिसले

प्राथमिक तपासानुसार, घरात काम करणाऱ्या दोन तरुणांवर संशय व्यक्त केला जात आहे. आरोपींनी घरातून दागिने आणि रोख रक्कम चोरली आणि बाईकवरून पळून गेल्याचं सांगितलं जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन जण लिफ्टमध्ये संशयास्पदरित्या दिसल्यानंतर तपासाला वेगळीच दिशा मिळाली आहे. 

हे ही वाचा: Personal Finance: SIP सुरू केली म्हणून निवांत होऊ नका, छोट्या चुका लावतील वाट!

पोलिसांचा तपास...

या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे. तपासादरम्यान, पोलीस अपार्टमेंटच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. या घटनेमुळे गेटेड कम्युनिटीजमधील सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. डीसीपी यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात सुद्धा शोध सुरू केला असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp